शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबीय मुलीला घ्यायला गेले, चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज लांबविला

By विजय.सैतवाल | Updated: June 16, 2024 21:55 IST

रोख ५० हजारांसह सोन्या-चांदीचे दागिने गायब

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : ध्यान साधना केंद्रात शिबिरासाठी गेलेल्या मुलीला घेण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयाच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी रोख ५० हजारांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना १४ जून ते १६ जून दरम्यान सुनंदिनी पार्कमध्ये घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय असलेले दिनेश भगवान भालेराव (४४, रा. सुनंदिनी पार्क) यांची मुलगी इगतपुरी येथे ध्यान साधना केंद्रात शिबिरासाठी गेली होती. तिला घेण्यासाठी १४ जून रोजी दिनेश भालेराव हे कुटुंबीयांसह गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी लोखंडी ग्रीलच्या दरवाजाचा कडीकोयंडा व आतील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख ५० हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.

१६ रोजी पहाटे साडेचार वाजता भालेराव हे घरी परतले त्या वेळी त्यांना दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. आत जाऊन पाहिले तर सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.

घाईत २५ ग्रॅम सोने खाली पडलेचोरटा चोरी करून जात असताना त्याच्या हातून २५ ग्रॅम सोन्याचा दागिना खाली पडला. त्यामुळे तेवढे सोने चोरीपासून वाचले. चोरी करताना चोरट्याला कोणाचा तरी आवाज आला, त्या वेळी पळ काढताना त्याच्या हातून हे सोने पडले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी