शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

धनाढ्याच्या मुलाला वाचविण्यासाठी चालकाने घेतला गुन्हा अंगावर!

By अनिल गवई | Updated: July 16, 2024 23:39 IST

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी : मृताच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा संशय

खामगाव : राज्यात हिट ॲन्ड रन प्रकरणं गाजत असतानाच, एका धनाड्याच्या मुलाचा बचाव करण्यासाठी चक्क चालक बदलण्यात आला. खामगाव तालुक्यातील माथनी येथील एका चालकाने हा गुन्हा अंगावर घेतला. युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या युवकाला वाचविण्यासाठी ही सारवासारव करण्यात आली. मात्र सत्य कधी लपत नाही, एक ना एक दिवस ते बाहेर येते, अशीच प्रचिती यानिमित्ताने समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील एका वैद्यकीय व्यावसायिकाच्या पुतण्याने एमएच-२७, डीई-७५४२ या भरधाव कारने एमएच-२८, बीके-८७७२ या क्रमांकाच्या दुचाकीस्वाराला उडविले. ही घटना २ जुलै रोजी दुपारी पाच वाजता दरम्यान खामगाव-शेगाव रोडवर घडली. 

गंभीर जखमी दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर शेगाव ग्रामीण पोलिसांत घटनास्थळावर नसलेल्या एका चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. इतकेच नव्हे तर धनाड्याच्या सांगण्यावरून मृताच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रकारही घडल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुणे येथे गाजत असलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाचीच पुनरावृत्ती हे प्रकरण असल्याची जोरदार चर्चा आहे.

नातीच्या लग्नासाठी घेतला गुन्हा अंगावरया प्रकरणाची कुणकुण लागताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील प्रकरणाची उलट तपासणी केली. त्यावेळी बदललेल्या आरोपीने नातीच्या लग्नासाठी हा गुन्हा अंगावर घेतल्याची कबुली दिली. गावातील एका लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून त्याने प्रकार केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

रक्ताचे नमुने बदलल्याचा संशयघटनेनंतर शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये अनेक वेगवान घडामोडी झाल्या. धडक देणाऱ्या युवकानेच अपघातग्रस्त युवकाला रुग्णालयात हलविले. दरम्यान, मृताच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर मृताच्या रक्त नमुन्याशीही छेडछाड करण्यात आल्याचा सूत्रांचा दावा आहे.

मृताच्या नातेवाईकाने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित नावाच्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परिवारातील सदस्याचा मृत्यू झाल्याने भेदरलेल्या अवस्थेत दिलेल्या नावावरून गुन्हा दाखल केला आहे. मात्र, वस्तुस्थिती समोर आल्यानंतर गुन्ह्यातील खरा आरोपी शोधून काढण्यात आला. मृताच्या नातेवाईकाने दिलेल्या नावामुळे हा घोळ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.- दिलीप वडगावकर, पोलिस निरीक्षक, शेगाव ग्रामीण

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी