शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इब्राहिम व आकाश यांना केले स्थानबद्ध; वाळू तस्करीसह आवश्यक वस्तूंचा काळाबाजार

By विलास.बारी | Updated: August 18, 2023 18:07 IST

भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील इब्राहिम ऊर्फ टिपू ऊर्फ टिप्या सत्तार मन्यार (२९) याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात वेगवेगळे सात गुन्हे दाखल आहेत.

जळगाव : पायरेटेड व्हिडीओ, वाळू तस्करी, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार तसेच इतर वेगवेगळे गुन्हे दाखल असलेले भुसावळ तालुक्यातील वराडसीम व चोपडा येथील प्रत्येक एका जणाविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्यांना पुणे व नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील इब्राहिम ऊर्फ टिपू ऊर्फ टिप्या सत्तार मन्यार (२९) याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात वेगवेगळे सात गुन्हे दाखल आहेत. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांनी २५ रोजी त्याच्याविरूद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला होता. तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यानुसार १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्दतेचे आदेश दिले. भुसावळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृह (पुणे) रवानगी केली.

या सोबतच चोपडा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आकाश संतोष भोई (२२, चोपडा) याच्याविरुध्ददेखील सात गुन्हे दाखल आहेत. तसेच अदखलपात्र गुन्हे, प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्धही चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे दि. ११ रोजी पाठविला होता. त्या प्रकरणीही जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबध्दतेचे आदेश दिले. त्यानुसार चोपडा पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी ताब्यात घेवून नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी केली. जिल्ह्यात इतर अनेक सराईत गुन्हेगार हे एमपीडीए कारवाईच्या रडारवर असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी