शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला कोर्टानं दिली दुहेरी जन्मठेप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 06:28 IST

आरोपीला लैंगिक अपराधांपासून बालसंरक्षण अधिनियमातील कलम ४ (२) व कलम ६ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नागपूर - दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला गुरुवारी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सत्र न्यायालयाचे न्या. ओ. पी. जयस्वाल यांनी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना मोमीनपुरा येथील आहे.

आरोपीला लैंगिक अपराधांपासून बालसंरक्षण अधिनियमातील कलम ४ (२) व कलम ६ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय, त्याला अन्य काही कलमांतर्गत वेगवेगळ्या कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व शिक्षा त्याला एकत्र भोगायच्या आहेत. आरोपी व्यवसायाने ऑटोचालक असून, त्याची पत्नी गर्भवती असताना १७ मे २०१९ रोजी मरण पावली. त्यावेळी त्याची मोठी मुलगी १४ वर्षे, तर लहान मुलगी १२ वर्षे वयाची होती. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने दोन्ही मुलींवर वाईट नजर टाकायला सुरुवात केली. तसेच जून २०१९ ते १३ नोव्हेंबर २०२० या कालावधीत दोन्ही मुलींवर वारंवार बलात्कार केला. त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.

नोव्हेंबर २०२० मध्ये दोन्ही मुली मामाच्या घरी गेल्या होत्या. स्वत:च्या घरी जाण्याचा दिवस उजाडल्यानंतर लहान मुलीच्या अश्रूंचा बांध फुटला. मामाने कारण विचारल्यानंतर तिने बापाच्या कुकृत्याची माहिती दिली. त्यानंतर मामाने दोन्ही मुलींमध्ये धाडस भरून त्यांना तहसील पोलिस ठाण्यात नेले. मुलींनी बापाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला २१ नोव्हेंबर २०२० रोजी अटक केली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले.

नातेवाइकांनाही शिक्षामोठा भाऊ, वहिनी व दुसऱ्या पत्नीला आरोपीच्या कुकृत्याची माहिती होती; परंतु त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नाही. त्यामुळे तिघांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली.

पुनर्वसनाचा आदेशदोन्ही पीडित मुलींच्या पुनर्वसन व शिक्षणाकरिता तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश न्यायालयाने जिल्हा विधिसेवा न्यायाधिकरणच्या सचिवांना दिले. तसेच मुलींना भरपाई अदा करण्याचा आदेशही दिला.