शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

कळस गाठला! ५ मुलांच्या आईचं शेजाऱ्याशी सूत जुळलं; संशयाचा भूत मानगुटीवर बसताच पतीचा असा केला गेम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:53 IST

अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने क्रूरतेची सीमा ओलांडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने क्रूरतेची सीमा ओलांडल्याची धक्कादायक घटना दादरी परिसरात घडली आहे. पाच मुलांच्या मातेने आपल्या शेजारी राहणाऱ्या प्रियकरासोबत मिळून पतीला आधी बेसावध केले, त्याला मद्यधुंद केले आणि त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, १६ फेब्रुवारी रोजी दादरी येथील शिव वाटिका कॉलनीजवळ एका अज्ञात तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने या मृतदेहाची ओळख पटली. हा मृतदेह घोडी बछेडा गावातील रहिवासी गोविंद रावल उर्फ भूरा याचा असल्याचे स्पष्ट झाले.

अवैध संबंधांचा अडसर ठरला जीवघेणा

गोविंद रावल हा अंड्याची गाडी लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्याला दारूचे व्यसन होते आणि तो अनेकदा पत्नीला मारहाण करायचा. याच दरम्यान, त्याच्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या रोहित रावल याच्याशी गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध जुळले होते. या अनैतिक संबंधांचा संशय गोविंदला आला होता, ज्यावरून घरात रोज खटके उडत होते. ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या मोठ्या वादानंतर पत्नीने पतीला कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला.

असा रचला हत्येचा कट

१२ फेब्रुवारी रोजी ठरलेल्या प्लॅननुसार, पत्नीने आपला प्रियकर रोहितला सिग्नल दिला. रोहितने आपल्या मित्रांच्या मदतीने गोविंदला घरातून बोलावून नेले. एका निर्जन ठिकाणी नेऊन त्यांनी गोविंदला जबरदस्तीने प्रचंड दारू पाजली. जेव्हा गोविंद नशेत पूर्णपणे धुंद झाला, तेव्हा नफीस नावाच्या साथीदाराने धारदार शस्त्राने त्याच्यावर एकामागून एक सपासप वार केले. या हल्ल्यात गोविंदचा जागीच मृत्यू झाला.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न फसला

हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह एका बाउंड्री वॉलजवळ फेकून दिला होता. मात्र, पकडले जाऊ या भीतीने त्यांनी १५ फेब्रुवारीला पुन्हा घटनास्थळी जाऊन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पण अंधारामुळे त्यांना यश आले नाही. अखेर १६ तारखेला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या.

पोलिसांची कारवाई

एडिशनल डीसीपी सुधीर कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणात पत्नी, तिचा प्रियकर रोहित आणि दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हत्येत वापरलेले धारदार शस्त्र, एक मोटारसायकल, अवैध कट्टा आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. १८ वर्षांच्या संसारानंतर आणि ५ मुलं असतानाही महिलेने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mother of five, lover kill husband over affair suspicion.

Web Summary : In Dadri, a woman and her lover murdered her husband, fueled by suspicion of her infidelity. The wife, with her lover's help, intoxicated and fatally attacked him. Police arrested the wife, lover, and accomplices.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार