शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माथेफिरू पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या, नाऊर येथील घटना, पतीला अटक

By शिवाजी पवार | Updated: April 28, 2023 10:56 IST

हत्येच्या घटनेने उडाली खळबळ

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील नाऊर येथे घरगुती वादातून माथेफिरू पतीने पत्नीला साखळदंडाने बांधून डोक्यात टणक वस्तूने मारून हत्या केली. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. माथेफिरू पतीला तालुका पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली.

निर्मला शांताराम देसाई (वय ४२) असे मयत महिलेचे नाव आहे. तिचा पती शांताराम खंडेराव देसाई (वय ४५) याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाऊर चौफुलीजवळ देसाई यांची वस्ती आहे. निर्मला देसाई व पती शांताराम खंडेराव देसाई हे दोघे तेथे राहत होते. त्यांना एक विवाहित मुलगा व मुलगी आहेत. पती-पत्नीमध्ये गुरुवारी वाद झाले.  त्यानंतर पत्नीला साखळदंडाने बांधून तिला मारहाण करण्यात आली तसेच डोक्यात टणक वस्तूने घाव घातला. यात निर्मला या गंभीर जखमी झाल्या.

त्यानंतर दोरीच्या साह्याने गळा आवळून जीवे मारल्याचा प्राथमिक अंदाज साखर कामगार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने यांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निर्मला देसाई यांचा मृतदेह येथील साखर कामगार रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पती शांताराम विरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. शेजारच्या एका महिलेने पोलिसांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी