शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 16:40 IST

एका पित्याने NEET परीक्षा पास केल्यामुळे आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

देशभर ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजना मोठ्या प्रमाणात राबवली जात असताना, गुजरातमध्ये एका पित्याने NEET परीक्षा पास केल्यामुळे आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा देतात.

गुजरातच्या बनासकांठा येथील १८ वर्षीय चंद्रिका चौधरीने NEET प्रवेश परीक्षेत ४७८ गुण मिळवून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी पात्रता मिळवली होती. तिला पुढे शिक्षण घेऊन स्वतंत्रपणे जगायचं होतं, पण तिच्या वडिलांना आणि काकाला हे मान्य नव्हतं. त्यांनी २५ जून २०२५ रोजी चंद्रिकाला दुधात गुंगीचे औषध मिसळून दिलं आणि नंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.

मुलीला शिक्षण द्यायचं नव्हतं कुटुंबाला

पोलिसांच्या माहितीनुसार, चंद्रिकाच्या काकाने, शिवरामने, गावातील लोकांना सांगितलं की चंद्रिकाला हृदयविकाराचा झटका आला होता. पोलिसांनी शिवरामला अटक केली आहे, तर चंद्रिकाचे वडील सेंधा अद्याप फरार आहेत. चंद्रिकाचा मित्र हरेश चौधरी याने सांगितलं की, चंद्रिकाचे काका शिवराम अनेक महाविद्यालयांमध्ये गेले होते. तिथे त्यांनी मुलं-मुली एकत्र शिकताना पाहिलं होतं. त्यांनी चंद्रिकाच्या वडिलांना सांगितलं की तिला तिथे पाठवू नका, कारण ती एखाद्या मुलाच्या प्रेमात पडेल आणि लग्न करेल. यानंतर त्यांनी चंद्रिकाचा फोन काढून घेतला आणि सोशल मीडियापासून दूर राहून फक्त घरकाम करायला सांगितलं.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनावहरेशने गुजरात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या बंदी प्रत्यक्षीकरण याचिकेवर सुनावणी होण्याच्या काही दिवस आधीच चंद्रिकाची हत्या झाली, ज्यामुळे या पूर्वनियोजित हत्येचा पर्दाफाश झाला. फेब्रुवारी महिन्यात तिची आणि हरेशची भेट झाली होती. पोलिसांनुसार, चंद्रिकाच्या कुटुंबीयांनी घाईघाईत तिच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं आणि पोस्टमार्टम न करताच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरात