शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जेवणावरून झालेला वाद जिवावर बेतला; वनराईत एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 12:50 IST

तेजबहादूर रामलखन मौर्य (४५) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. गोरेगाव वाइन शॉपसमोर हनुमान टेकडी मुलुंड लिंक रोड या ठिकाणी एक चायनीज अन्नपदार्थ विकणारे दुकान आहे.

मुंबई : जेवण घेताना झालेला किरकोळ वाद एकाच्या जिवावर बेतला. गोरेगावच्या वनराई परिसरात तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे.

तेजबहादूर रामलखन मौर्य (४५) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. गोरेगाव वाइन शॉपसमोर हनुमान टेकडी मुलुंड लिंक रोड या ठिकाणी एक चायनीज अन्नपदार्थ विकणारे दुकान आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत इसम मुकेश रमेश झांजरे (३२) आणि मौर्य यांच्यात बऱ्याच वर्षांपासून खासगी वाद होते. त्यानुसार आरोपी २५ ऑक्टोबर रोजी चायनीजच्या दकानावर जेवण घेण्याकरिता आला.

त्यावेळी झांजरे आधीच त्या ठिकाणी हजर होता. त्यावेळी पुन्हा काही कारणावरून दोघांची एकमेकांसोबत बाचाबाची सुरू झाली. त्यात झालेल्या भांडणात आरोपीने मयताला हाताने धक्काबुक्की सुरू केली आणि नंतर त्याच्याजवळ असलेल्या स्टीलच्या चाकूने मयताच्या छातीवर व पोटात चाकूने त्याच्यावर हल्ला चढवत त्याला जखमी केले.

स्थानिकांनी हा प्रकार पाहिला आणि तातडीने झांजरे यांना रिक्षाने जोगेश्वरी पूर्व येथे असलेल्या ट्रामा केअर रुग्णालय नेले. जिथे रात्री साडेबाराच्या सुमारास त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्याला अटक करत खुनासाठी वापरलेला चाकू देखील हस्तगत केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी