शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील सेक्स वर्कर महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीस राज्याबाहेरून अटक

By नितीन पंडित | Updated: November 27, 2023 15:24 IST

पश्चिम बंगाल रेल्वे स्थानकातून शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील देह व्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती असलेल्या हनुमान टेकडी या परिसरातील एका खोलीत हत्या झालेल्या सेक्स वर्कर महिलेच्या हत्येच्या गुन्ह्यात ओडिसा राज्यात पळून जात असलेल्या आरोपीस पश्चिम बंगाल येथील खरगपूर रेल्वे स्थानकातून अवघ्या ४८ तासात अटक करण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश आले असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. आकाशकुमार उर्फ पप्पू देवेंद्र मलिक वय २४ रा.बालासोर ओडिसा असे अटक आरोपीचे नाव आहे.

२१ नोव्हेंबर रोजी रात्री देह व्यापार करणाऱ्या सेक्स वर्कर महिलेची खोलीतच दगडी पाटा वरवंटा डोक्यात मारून तिची हत्या केली होती.या वेळी घटनास्थळी तातडीने पोलिस पथकासह दाखल झालेले भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांनी त्याठिकाणी आलेल्या हत्या करणाऱ्या युवकाच्या मित्रास ताब्यात घेऊन त्याकडे चौकशी केली असता हत्या करणाऱ्या युवकाचा फोटो व वर्णन पोलिसांना दिले होते.

या प्रकरणी तातडीने पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे,सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक देशमुख, भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार,पोलिस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील,रामदास कोलते,पोलिस हवालदार शशिकांत खडे,प्रशांत राणे,पोलिस नाईक राजेंद्र गवा,सचिन कोळी,राहुल पवार,अशोक कोदे,संतोष कदम,संजय कोळी,पोलिस शिपाई नितीन नंदिवाले,संजय भोसल, लहू गावीत,गणेश हरणे,शरद गोसावी,रजनीकांत पऱ्हाड यांची तीन पथके तपासा साठी तैनात केली होती.त्यानंतर आरोपी हा आपल्या मूळ गावी पळून गेला असल्याची माहिती मिळाली.

पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, पोलिस शिपाई नितीन नंदीवाले,संजय भोसले यांचे पथक त्याच्या मागावर गेले असता आरोपीस आपल्या मूळगावी जाण्यासाठी पश्चिम बंगाल येथील खरगपूर रेल्वे स्थानकात रेल्वे बदली करावी लागत असल्याने आरोपी पप्पू हा गीतांजली एक्स्प्रेस मधून खरगपूर रेल्वे स्थानकात उतरताच पोलिस पथकाने त्यास ताब्यात घेतले व त्याकडे चौकशी केली असता त्याने हत्या केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करून भिवंडीत आणून न्यायालयात हजर केले असता १ डिसेंबर पर्यंत आरोपीस पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून ४८ तासात गुन्ह्याचा छडा लावून आरोपीस अटक केल्याने तपास पथकाची पोलीस बक्षिसासाठी शिफारस करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे .

 

टॅग्स :bhiwandiभिवंडी