शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारानंतर मृतदेह बादलीत कोंबला; बिहारमध्ये जाऊन पोलिसांनी मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 06:59 IST

शहरातील फेणेगाव परिसरातील चाळीतील सहा वर्षीय चिमुरडी १३ सप्टेंबरला हरवली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ती न मिळाल्याने पालकांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. 

भिवंडी - सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश आले आहे. 

पोलिस पथकाने बिहार राज्यात जाऊन आरोपी सलामत अंसारी (वय ३२) यास अटक केली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. आरोपी अन्सारी हा भिवंडीत यंत्रमाग कारखान्यात बिगारी काम करीत होता. मृत चिमुरडी चॉकलेट खाण्यासाठी सलामतकडे पैसे मागत होती. त्यावेळी त्याने तिला खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याची माहिती माहिती ढवळे यांनी यावेळी दिली. शहरातील फेणेगाव परिसरातील चाळीतील सहा वर्षीय चिमुरडी १३ सप्टेंबरला हरवली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ती न मिळाल्याने पालकांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. 

रात्री उशिरा चिमुरडीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेत असताना १५ सप्टेंबरला चिमुरडी राहत असलेल्या परिसरात दुर्गंधी येत  असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात शोध घेतला. तेथील एका कुलूपबंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी तपासणी केली असता त्या ठिकाणी अपहरण झालेल्या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला होता. त्याच खोलीमध्ये मिळालेल्या पुराव्याचे आधारे आरोपीचे नाव सलामत असे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी बिहार राज्यात पळून गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली. 

वेशांतर करून पाळत ठेवत आरोपीला अटकघटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलिस आयुक्त महेश पाटील, भिवंडी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहायक पोलिस आयुक्त किशोर खैरनार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलिस पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले होते. पोलिस निरीक्षक विजयकुमार कदम, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, कोलते, पोलिस हवालदार खाडे, राणे, पोलिस शिपाई भांगरे, गावीत, हरणे, ताटे, सोनावणे, कदम, पराड, नंदीवले या पथकाने बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील नवादा या गावात वेषांतर करून पाळत ठेवून संशयित सलामत अली आलम अन्सारी यास ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने आरोपीस स्थानिक न्यायालयाच्या परवानगीने भिवंडीत आणून अटक करण्यात आल्याचे ढवळे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी