शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा दरोड्यातील आरोपी अखेर जेरबंद!

By appasaheb.patil | Updated: July 17, 2023 14:51 IST

मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहितीदाराकडून पाहिजे असलेला आरोपी बोराळे गावाकडे जाणार असल्याची माहिती मिळाली हाेती.

सोलापूर : एका खुनासह फसवणूक, दरोड्यातील पाहिजे असलेला आरोपी १५ वर्षापासून राज्यातील विविध शहरात वेशांतर करून राहत होता. मंगळवेढा तालुक्यातील बोरोळे हद्दीत आल्यानंतर त्यास पकडण्यात सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. 

मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहितीदाराकडून पाहिजे असलेला आरोपी बोराळे गावाकडे जाणार असल्याची माहिती मिळाली हाेती. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे व त्यांच्या पथकाने सिध्दापूर ते बोराळे जाणा-या रस्त्यावर सापळा रचला. 

गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार एक जण बोराळे हद्दीत आल्यानंतर त्यास ताब्यात घेतले. अधिकची कसून चौकशी केली असता त्याने केलेले गुन्हे कबूल केले. शिवाय अभिलेख पडताळणी तपासणी केली असता पाहिजे आरोपी यादीतील हा आरोपी असल्याचे समोर आले. संबंधित आरोपीवर मंगळवेढ्यात तीन तर मंद्रुप येथे एक गुन्हा दाखल आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीस मंगळवेढा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेत्तृत्वाखाली पोलीस उप-निरीक्षक सुबोध जमदाडे, सहा.फौज घोळवे, पोहवा/परशुराम शिंदे, मपोना पल्लवी इंगळे, पोकॉ अजय वाघमारे, अन्वर अत्तार, यश देवकते, सुरज रामगुडे, मपोकॉ झळके, चापोहवा प्रमोद माने, यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी