शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे: पोटच्या मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पित्याला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2022 19:00 IST

ठाणे पोस्को न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: आपल्याच पोटच्या अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय पित्याला ठाणे अतिरिक्त सत्र व विशेष पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही व्ही वीरकर यांनी शनिवारी दोषी ठरवले. तसेच त्या नराधम पित्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून रेखा हिवराळे यांनी काम पाहिले. तर हा प्रकार २०१७ मध्ये भिवंडीत घडला होता.

पीडित मुलगीही १६ वर्षीय असून तिचे वडील तिला मारहाण करण्याचे धमकी देत, तिच्यावर घरातील सर्व जण झोपी गेल्यावर अत्याचार करत होते. तर ती घरात काम करत नाही म्हणून तिची आई तिला मारहाण करत होती. याला कंटाळून ती घरातून पळून गेली. याचदरम्यान एकदा रात्रीच्या वेळेस ती एका घराजवळ गेली असताना, त्या घरातील महिलेने तिला घरात घेऊन  विचारपूस केली. त्यावेळी तिने वडील अत्याचार करत असल्याने आपण घरातून पळून आल्याचे सांगितले. त्यानुसार त्या महिलेच्या मदतीने पीडित मुलीने भिवंडी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यावर नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांनी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला न्यायाधीश व्ही व्ही वीरकर यांच्या न्यायालयाच्या समोर आल्यावर सरकार वकील रेखा हिवराळे यांनी आठ साक्षीदारांच्या साक्षीसह सादर केलेले पुरावे ग्राहय मानून आरोपी पित्याला जन्मठेपेसह दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली. दंडाची रक्कम न भरल्यास १०० दिवसांची साध्या कैदेची शिक्षा भोगावी लागणार असे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेMolestationविनयभंग