शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे: चारित्र्याच्या संशयातून कांदीवलीतील शेजाऱ्याचा खून करणा-यास हैद्राबाद येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:28 IST

काशीमीरा खाडी परिसरात १२ मार्च रोजी सापडलेल्या एका अनोळखीच्या खूनाचा छडा लावण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून शेजा-याचा कन्हैया गुप्ताने खून केल्याचे उघड झाले.

ठळक मुद्देआकस्मिक मृत्युचे झाले खूनाच्या गुन्हयात रुपांतरठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी१२ मार्चला मिळाला होता अनोळखी मृतदेह

ठाणे : पत्नीचे रमेश चनारा (३०, रा. कुरार, कांदिवली, मुंबई) या पूर्वाश्रमीच्या शेजा-याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याचा खून करणा-या कन्हैय्या गुप्ता (३०, रा. क्रांतीनगर, कांदिवली) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. कोणताही धागादोरा नसताना आधी आकस्मिक मृत्यूची नोंद झालेल्या या गुन्ह्याचा पोलिसांनी कौशल्याने तपास करून यातील आरोपीला हैदराबाद येथून अटक केली.भार्इंदरच्या सृष्टी खाडी परिसरात १२ मार्च २०१८ रोजी दुपारी काशिमीरा पोलिसांना एक अनोळखी मृतदेह मिळाला होता. त्याच्या खिशातील आधारकार्डच्या साहाय्याने त्याची ओळख पटवण्यात आली. रमेश चनारा हा कांदिवलीतून ९ मार्च रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार १० मार्च रोजी कुरार व्हिलेज पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक अभिजित टेलर आणि हवालदार विजय ढमरे आदींच्या पथकाने पुढे केलेल्या सखोल चौकशीमध्ये रमेश हा प्रभू गुप्ता याला शेवटचा भेटल्याचे तपासात उघड झाले. प्रभूच्याच चौकशीमध्ये त्याचा भाऊ कन्हैय्या गुप्ता हा सीसीटीव्हीचे काम करत असून तो ओमन देशात गेल्या एक वर्षापासून नोकरीला आहे. दीड वर्षापूर्वी कांदिवलीतील एका चाळीतील खालच्या खोलीत कन्हैय्या, पत्नी, त्याचा भाऊ आणि आईसह वास्तव्याला होता. तर, वरच्या खोलीत रमेश राहायला होता. जवळच खोल्या असल्यामुळे आपण कामानिमित्त बाहेर असताना पत्नी आणि रमेश यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. याच संशयातून त्याने पत्नीला बिहारमध्ये गोपालगंज येथील माहेरी पाठवले. तर, तो पुन्हा ओमन देशात नोकरीला निघून गेला. परदेशी गेला असला तरी पत्नीच्या अनैतिक संबंधाची सल त्याच्या मनात सारखी सलत होती. यातूनच त्याने रमेशचा काटा काढायचे ठरवले. ९ मार्च रोजी परदेशातून तो मुंबईत आला. आल्यानंतर त्याने भाऊ प्रभू याच्याशी संपर्क साधून रमेशला कांदिवलीतील अप्पापाडा येथे रात्री ११ वा.च्या सुमारास घेऊन येण्यास सांगितले. तिथे आधीच वाट पाहत असलेल्या कन्हैय्याने रिक्षातून त्याला काशिमीरा खाडी परिसरात नेले. तिथेच रात्री १२ वाजताच्या सुमारास त्याच्या डोक्यात हेल्मेट टाकून आणि गळा आवळून खून केला. या खुनानंतर पसार झालेल्या कन्हैय्याला उपनिरीक्षक टेलर, हवालदार विजय ढमरे, पोलीस नाईक संजय शिंदे आणि पुष्पेंद्र थापा यांच्या पथकाने हैदराबादच्या काटीनार परिसरातून २२ मार्च रोजी अटक केली. त्याने खुनाची कबुली दिल्यानंतर याप्रकरणी आता पोलिसांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने २३ मार्च रोजी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेMurderखूनCrimeगुन्हा