शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा युवा मोर्चाच्या महासचिवावर दहशतवादी हल्ला; गोळी झाडून हत्या, दोघे जखमी

By हेमंत बावकर | Updated: October 29, 2020 22:07 IST

Terrorist Attack: पोलीस आणि सैन्यदल एकेका घराची तपासणी करत आहेत. हे दहशतवादी एक वाहनातून आले होते. हल्ला केल्यानंतर तेथून त्या वाहनाने पसार झाले.

श्रीनगर : जम्मू काश्मीरला 370 कलमातून मुक्त केल्यानंतर भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आले आहेत. भाजपाच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असून आजही कुलगाममध्ये एका नेत्यावर हल्ला झाला. यामध्ये गोळी लागल्याने नेत्याचा मृत्यू झाला असून दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. 

गंभीर जखमी कार्यकर्त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. पोलीस व सैन्याने घटनास्थळाचा भाग घेरला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु केला आहे. भाजपा युवा मोर्चाचे महासचिव फिदा हुसेन हे दोन सहकाऱ्यांसोबत घराच्या दिशेने जात होते. वाटेत दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्या वाहनावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यानंतर दहशतवादी तेथून फरार झाले. घटनास्थळी पोहोचलेस्या पोलिसांनी भाजपा नेत्यासह साथीदारांना हॉस्पटलमध्ये नेले. मात्र, उपचारावेळी फिदा हुसेन यांचा मृत्यू झाला.

जखमी सहकाऱ्याची ओळख पटली असून त्याचे नाव उमर हजाम आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. पोलीस आणि सैन्यदल एकेका घराची तपासणी करत आहेत. हे दहशतवादी एक वाहनातून आले होते. हल्ला केल्यानंतर तेथून त्या वाहनाने पसार झाले. याआधीही भाजपाच्या नेत्यांवर दहशतवादी हल्ले झाले आहेत. अनेकांचा मृत्यू झाला आहे. य़ामुळे घाबरून अनेकांनी राजीनामा दिला आहे. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर