शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी मजकूर प्रकरण : नेपाळ कनेक्शन आणि संशयित मोबाईल तपासावर पोलीसांची नजर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 20:46 IST

संशयित आरोपीला आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी 

ठळक मुद्देअमीरउल्ला समीउल्ला शेख (३३) याला न्यायालयाने पुन्हा १७ जुनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.मनोरुग्ण असल्याचे आरोपीकडून सांगितले जात असले तरी त्याचीही पोलिसांकडून खातरजमा केली जात आहे.

मधुकर ठाकूरउरण - उरण येथील खोपटा पुलाच्याखाली असलेल्या खांबावर सांकेतिक कोडमध्ये दहशतवादी पद्धतीने मजकूर लिहून परिसर आणि पोलीस, सुरक्षा यंत्रणेलाच हादरून सोडणाऱ्या संशयित अमीरउल्ला समीउल्ला शेख (३३) याला न्यायालयाने पुन्हा १७ जुनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हस्तगत  करण्यात आलेल्या मोबाईलची तपासणी, मनोरुग्ण असल्याची खातरजमा करून घेण्यासाठी, नेपाळ कनेक्शन तपासणी आणि इतर संशयित बाबतीत बारकाईने तपासून पाहण्यासाठी न्यायालयाने आणखी पाच दिवसांचा रिमांड मंजूर केला असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वपोनि जगदीश कुलकर्णी यांनी दिली.सोमवारी (ता. ४)  उरण येथील खोपटा पुलाच्याखाली असलेल्या खांबावर सांकेतिक कोडमध्ये दहशतवादी पध्दतीने मजकूर लिहल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आल्यानंतर स्थानिक पातळीवरीलच नव्हे देशपातळीवरील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेची झोप पार उडाली आहे.या प्रकारात खोडसाळपणा केलेला आढळून आल्याची शक्यता दूर सारत पोलिसांनी सुरुवातीपासूनच गांंभिर्याने तपास कामाला सुरुवात केली होती. सलग तीन दिवसांच्या तपासानंतर पुलाच्या खांबावर दहशतवादी मजकूर लिहणाऱ्या संशयिताला मजकूर लिहताना पाहिल्याचा पहिला साक्षीदार पोलिसांनी शोधून काढला. त्यानंतर दहशतवादी मजकूर लिहणारा संशयित अमीरउल्ला समीउल्ला शेख येथे मागील दहा वर्षांपासून धसाखोसी खोपटे येथेच कामानिमित्ताने वास्तव्य करून असल्याची बित्तंबातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनीही अधिक वेळ न दडवता सावजावर शिताफीने झडप घातली आणि गुरुवारी अटक होती.न्यायालयाने त्याला 12 जुनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. यानंतरच्या तपासणीत पोलिसांनी दुरुस्तीसाठी देण्यात आलेला मोबाईल आरोपीकडून हस्तगत करण्यातही पोलिसांना यश आले आहे. मात्र तपास कामात संशयित आरोपी अमीरउल्ला समीउल्ला शेख सहकार्य करीत नाही. त्याशिवाय तो मनोरुग्ण असल्याचेही सांगू लागला आहे. आरोपींची सासरवाडी नेपाळमध्ये आहे. दोन मुलांची आई असलेली आरोपीची पत्नी मुलांसह उरणमध्ये दाखल झाली आहे.पोलिसांसाठी तपासकामी मोबाईल हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. त्यादृष्टीकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपीची सासरवाडी नेपाळमध्ये आहे. त्यामुळे आरोपीचे नेपाळ कनेक्शनही तपासून पाहिले जाणार आहे. मनोरुग्ण असल्याचे आरोपीकडून सांगितले जात असले तरी त्याचीही पोलिसांकडून खातरजमा केली जात आहे. आरोपीची देशभरातील वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडूनही कसून तपासणी करण्यात येत असल्याची माहितीही उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी दिली.

टॅग्स :TerrorismदहशतवादCourtन्यायालयArrestअटकMobileमोबाइलNepalनेपाळ