शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! भररस्त्यात तरुणावर गोळ्या झाडल्या; पाठलाग करून चाकूनेही केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 18:37 IST

आरोपी पळून गेल्यानंतरही दुकानदाराने तरुणाला उचललं नाही किंवा पोलिसांनाही या घटनेबाबत कळवलं नाही.

राजधानी दिल्लीतील काल प्रजासत्ताक दिनी एक खळबळजनक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या पाठलाग करत गोळ्या झाडून तरुणाचा खून करण्यात आला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात भर बाजारात तरुणावर गोळ्या झाडण्यात आला.  गोळीबारानंतर तरुण खाली कोसळताच आरोपींनी त्याच्यावर चाकूनेही सपासप वार केले आणि  घटनास्थळाहून पळ काढला. तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होता. हे सगळं हत्याकांड एका दुकानाबाहेर झालं. मात्र तरुणाला वाचवण्यासाठी धावण्याऐवजी दुकानदार आपल्या दुकानातील सामान आवरण्यात व्यग्र असल्याचं सीसीटीव्हीतून समोर आलं आहे. तसंच आरोपी पळून गेल्यानंतरही दुकानदाराने तरुणाला उचललं नाही किंवा पोलिसांनाही या घटनेबाबत कळवलं नाही.

काही वेळानंतर तरुणावर झालेल्या हल्ल्याची बाब इतर नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तरुणाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी सदर तरुणाला मृत घोषित केलं.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांकडून आरोपींची ओळख पटवली जात असून त्यांचा शोध घेतला जात आहे. दारू पिताना झालेल्या वादाचं रुपांतर नंतर भयंकर हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी