शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अ‍ॅट्रोसिटीचे दहा हजार गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 06:54 IST

अनुसूचित जाती व जमातीच्या संरक्षण व हक्कासाठी घटनेमध्ये विशेष कायद्याची तरतूद असली, तरी तो कागदावरच अस्तित्वात असल्याची परिस्थिती आहे.

- जमीर काझीमुंबई  - अनुसूचित जाती व जमातीच्या संरक्षण व हक्कासाठी घटनेमध्ये विशेष कायद्याची तरतूद असली, तरी तो कागदावरच अस्तित्वात असल्याची परिस्थिती आहे. राज्यात यासंबंधीच्या अत्याचाराचा आलेख वाढत राहिला असून, गेल्या सव्वा पाच वर्षांत ‘अ‍ॅट्रोसिटी’चे तब्बल ९,९८२ गुन्हे राज्यभरात दाखल आहेत. त्यापैकी सर्वाधिक ९,४८७ अनुसूचित जाती (एससी) समाजासंबंधीत गुन्हे आहेत. यामध्ये पुणे ग्रामीण राज्यात सर्वात पुढे आहे. त्या खालोखाल अहमदनगर व सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक आहे.राज्यात दाखल गुन्ह्यांपैकी जवळपास १२ टक्क्यांवर म्हणजे १,२५० गुन्ह्यांचा अद्याप तपासच पूर्ण झालेला नाही. त्यामुळे त्यातील आरोपी मोकाटपणे फिरत आहेत. १ जानेवारी, २०१४ ते ३१ मार्च, २०१९ या कालावधीतील दाखल गुन्ह्यांची ही माहिती आहे. पोलीस मुख्यालयातून माहिती अधिकार कायद्यान्वये ही माहिती हाती लागली आहे. अर्थात, ही आकडेवारी पोलिसांच्या दप्तरी दाखल गुन्ह्यांची आहे. प्रत्यक्षात त्याचे प्रमाण अधिक असल्याची शक्यता आहे.गेल्या सव्वा पाच वर्षांमध्ये राज्यात ९ हजार ९८२ गुन्हे दाखल असून, त्यामध्ये ‘एससी’ अत्याचाराच्या ९,४८७ तर ‘एसटी’ अत्याचाराच्या २,४७९ घटना घडल्या आहेत, तर ‘पीसीआर’(नागरी हक्क संरक्षण) १६ प्रकरणे दाखल आहेत. यापैकी १,२५० गुन्ह्यांचा तपास पोलिसांना पूर्ण करता आलेला नाही. तपासाबाबत उदासीनता दाखविल्याने आरोपीला अटक करणे तर दूरच, पोलिसांना सबळ पुरावेसुद्धा अद्याप जमा करण्यात अपयश आल्याची परिस्थिती आहे.पुणे ग्रामीण पोलीस घटकामध्ये सर्वाधिक ६६५ प्रकरणे दाखल आहेत, तर यवतमाळ (६६०), अहमदनगर(६०८) व सोलापूर (५६२) जिल्ह्यांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो. अन्य जिल्ह्यांतही अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढहोत आहे.(उद्याच्या अंकात: सिद्ध गुन्ह्यांचे प्रमाण अवघे १४ टक्के; नऊ हजारांवर खटले प्रलंबित)मुंबई महानगरात एक हजाराहून अधिक गुन्हेमुंबई महानगरांतर्गत येणाऱ्या पाच पोलीस घटकांमध्ये गेल्या सव्वा पाच वर्षांत ‘अ‍ॅट्रोसिटी’चे एकूण १,०६६ गुन्हे दाखल आहेत.त्यामध्ये मुंबई (१९३), नवी मुंबई (२३२), ठाणे (१९९), पालघर (१२३), रायगड (१८०) गुन्ह्यांचा समावेश आहे.मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील डॉ. पायल तडवी हिने वरिष्ठ सहकाऱ्यांकडून झालेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर, अनुसूचित जाती-जमातीतील व्यक्तींचा होणारा छळ व अत्याचाराबाबत देशभरात मोर्चे काढत निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यातील ‘अ‍ॅट्रोसिटी’च्या गुन्ह्यासंबंधीच्या सद्यस्थितीचा आढावा घेणारी ही वृत्त मालिका...

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदा