शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आळेफाटा येथे दहा लाखांच्या बनावट नोटा देत ठगविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 20:26 IST

शंभर रुपयांच्या सुट्टया नोटा देण्याचे आमिष दाखवून खोट्या नोटा देवून सुमारे दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात दहा जणांविरुध्द फिर्याद दाखल झाली आहे.

ठळक मुद्देशंभर रूपयांच्या सुट्टया नोटा देण्याच्या बदल्यात वीस टक्के ज्यादा रक्कम देण्याचे आमिष आळेफाटा पोलीस ठाण्यात दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

आळेफाटा : शंभर रुपयांच्या सुट्टया नोटा देण्याचे आमिष दाखवत खोट्या नोटा देवून सुमारे दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष नामदेव मोरे (रा. पाबळ, ता. शिरूर) यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यांना निवडणुकीकरिता शंभर रूपयांच्या सुट्टया नोटा देण्याच्या बदल्यात दिलेल्या रकमेच्या वीस टक्के ज्यादा रक्कम देण्याचे आमिष काही व्यक्तींनी दाखवले. त्यानुसार मोरे यांनी दहा लाख रक्कम आळेफाटा बसस्थानकात सोमवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर संबंधितांना दिली. त्या बदल्यात त्यांना एका बॅगमध्ये सुट्टया नोटा असल्याचे सांगितले. काही वेळातच मोरे यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये दोनशे रूपयांच्या खोट्या नोटांचे दहा ते बारा बंडल दिसले. वर नोटा आणि खाली कोरे कागद असे हे  बंडल होते.   दरम्यान त्यांनी आळेफाटा पोलीस ठाणे गाठत फसवणूक झाल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने बसस्थानक गाठत काही जणांना ताब्यात घेतले. यानंतर यामध्ये सहभागी असलेल्या इतरांची नावे पुढे आली. एकूण दहा जणांना याप्रकरणी ताब्यात घेत मंगळवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक गणेश ऊगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती डमाळे अधिक तपास करत आहे. =====

टॅग्स :PuneपुणेnarayangaonनारायणगावPoliceपोलिसArrestअटकfraudधोकेबाजी