मोखाडा- गो हत्या आणि गोमांस ला शासनाने बंदी घालण्याचा कायदा केला असला तरी, गो हत्या आणि गोमांस वाहतूक, चोरट्या पध्दतीने होत आहे. नाशिक भागातून खोडाळा - मोखाडा मार्गाने चोरट्या पध्दतीने सुमारे १२०० किलो गोमांस नेणारा टेम्पो मोखाड्यातील बजरंग दलाच्या कार्यर्क्त्यांनी शुक्रवारी रात्री दोन वाजता पकडून, मोखाडा पोलीसांच्या ताब्यात दिला आहे. टेम्पो चालक सलीम अब्दुल कापडे (४१) व त्याचा साथीदार अजीम अब्दुल रशीद मोमीन (४७ ) यांना मोखाडा पोलिसांनी अटक केली असून, टेम्पो व गोमांस असा ८ लाख ४४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींना जव्हारच्या प्रथम वर्ग न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, मोखाड्यातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी खोडाळा - मोखाडा मार्गावरील पुलाचीवाडी येथे शुक्र वारी रात्री दोन वाजता सुमारे १२०० किलो गोमांस चोरट्या पध्दतीने नेणारा टेम्पो पकडला आहे. बजरंग दलाचे मोखाडा तालुका प्रखंड ज्ञानेश्वर गांगड, धर्मा भोये, सुरेश वांगड, कान्हा बात्रे, केशव गभाले, आण िनरेश गिरंदले यांनी रात्री गस्ती घालून ही कारवाई केली आहे.८.४४ लाखांचा माल जप्तबजरंग दलाचे मोखाडा प्रखंड ज्ञानेश्वर गांगोडे यांच्या तक्रारीवरून मोखाडा पोलिसांनी टेम्पो चालक सलीम अब्दुल कापडे (४१) व त्याचा साथीदार अजीम अब्दुल रशीद मोमीन (४७) यांना अटक केली असून, टेम्पो ७ लाख व १ लाख ४४ हजाराचे गोमांस, असा एकूण ८ लाख ४४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बजरंग दलाने पकडला गोमांस नेणारा टेम्पो, बाराशे किलो बीफ, वाहन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 02:41 IST