शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरी बोलवून आंधळं केलं, झाडाला बांधून केली बेदम मारहाण; महिलेने पतीसोबत मिळून प्रियकराला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 12:41 IST

तेलंगणामध्ये एका महिलेने पतीच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Telagana Crime: तेलंगणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी नालगोंडा जिल्ह्यातील नोमुला गावात एका ३४ वर्षीय व्यक्तीला त्याच्या आधीच्या प्रेयसीने आणि तिच्या पतीने झाडाला बांधून संपवले. जोडप्याने डोळ्यात मिरची पावडर टाकून आधी त्या व्यक्तीला आंधळे केले आणि नंतर काठ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

मृत व्यक्तीचे नाव पीडित एन. जनाय्या असून तोनोमुला गावचा रहिवासी होता. तो त्याची आई एन. प्रमीला सोबत राहत होता आणि अविवाहित होता. जनाय्याचे त्याच गावातील एका विवाहित महिलेशी बऱ्याच काळापासून संबंध होते. दोन्ही कुटुंबांचा या प्रेमप्रकरणाला विरोध होता. कुटुंबियांनी दोघांनाही हे प्रेमप्रकरण मिटवण्यास सांगितले होते. मात्र तरीही जनाय्या महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता.

आठ महिन्यांपूर्वी महिलेने जनाय्या विरोधात छळ केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नाकरेकल पोलिसांनी त्याला अटक केली. जनाय्या एक महिना तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जनाय्या शांत होता. मात्र परत त्याने महिलेशी बोलणं सुरु केले. "जेव्हा जेव्हा माझ्या मुलाकडे पैसे होते तेव्हा ती त्याला भेटायला यायची. शुक्रवारी तिने त्याला घरी बोलावले. तो कदाचित ती घरी आहे एकटी समजून तिथे गेला असेल, पण तिचे कुटुंबीय तिथे होते आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला," असा आरोप जनाय्या याच्या आईने केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आणि तिचा पती नागराजू याने आध जनैय्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. नंतर काठ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी जनय्याला त्यांच्या घरासमोरील झाडाला बांधले आणि मारहाण करत राहिले. गावकऱ्यांनी जनय्याच्या आईला याची माहिती दिली. त्यानंतर जनय्याचे इतर कुटुंबिय तिथे आले. त्यांनी पोलिसांना तिथे बोलवलून जनय्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र जनय्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जनय्याच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केली. जनय्याच्या कुटुंबियांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :TelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारी