शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:06 IST

हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तेलंगणातील हैदराबाद शहरात हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी एका नवविवाहितेने गळफास लावून आपले जीवन संपवले. पतीकडून होणाऱ्या सततच्या त्रासामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत नवविवाहितेचे नाव पूजिता असून, तिचे लग्न अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच झाले होते. ही घटना हैदराबाद शहरातील कुकटपल्ली हाऊसिंग बोर्ड (KPHB) कॉलनीत घडली. पूजिताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पूजिताचा पती आणि त्याच्या कुटुंबातील इतर सहा सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कुकटपल्ली हाऊसिंग बोर्ड (KPHB) कॉलनीमध्ये सोन्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करणाऱ्या श्रीनिवासचा विवाह १६ एप्रिल रोजी खम्मम जिल्ह्यातील पूजितासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवस श्रीनिवासने पूजिताशी चांगले वर्तन केले. मात्र, त्यानंतर त्याने पूजिताला अतिरिक्त हुंडा आणण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. तो तिला हुंड्यासाठी छळू लागला.

पतीच्या छळामुळे पूजिता खचलीपतीच्या सततच्या छळामुळे पूजिता पूर्णपणे खचली होती. तिला आयुष्याचा वीट आला होता. पतीचा त्रास वाढल्याने व्यथित झालेल्या पूजिताने रविवारी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत पूजिताने उचललेल्या या टोकाच्या पावलाने सर्वांनाच धक्का बसला आहे. पूजिताच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी आरोप केला आहे की, पूजिताचा पती श्रीनिवास आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला मानसिक त्रास दिला. तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी लग्नावर ११ लाख रुपये खर्च केले होते आणि हुंडाही दिला होता.

मृत महिलेच्या कुटुंबीयांचे आरोपलग्नानंतर पूजिताचा पती आणि सासरच्या मंडळींनी १० लाख रुपयांची मागणी करून तिला त्रास देण्यास सुरुवात केली. पूजिताच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्यांनी श्रीनिवास आणि त्याच्या कुटुंबाला पीक काढल्यानंतर १० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. असे असूनही, त्यांनी पूजिताचा छळ करणे थांबवले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पती श्रीनिवास आणि त्याच्या कुटुंबातील इतर सहा सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdowryहुंडाhusband and wifeपती- जोडीदारTelanganaतेलंगणा