शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोरानं आईवडिलांसह बहिणीला संपवलं, FB वर मृतदेहांचे फोटो पोस्ट केले; पोलीस पोहचले इतक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 19:43 IST

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, टेक्सासमध्ये एका १५ वर्षीय युवकाने आई वडील आणि लहान बहिणीची हत्या केली आहे

ठळक मुद्देस्वत:चा जीव घेण्यापूर्वी युवकाने सर्व मृतदेहांचे फोटो ऑनलाईन सोशल मीडियावर पोस्ट केले. सोशल मीडियावर मृतदेहांचे फोटो शेअर केल्यानंतर आणि स्वत:वर गोळी झाडण्याची धमकी दिलीअचानक गोळीचा आवाज ऐकायला मिळाला त्यानंतर सगळं काही शांत झालं.

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका १५ वर्षीय मुलाने एका चित्तथरारक हत्याकांड घडवून आणलं आहे. या मुलाने आईवडील, बहिण आणि घरातील पाळीव कुत्र्यांचीही निर्दयी हत्या केली आहे. मुलाने या सगळ्यांना गोळ्या मारून ठार केले त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून त्याने आत्महत्या केली आहे. एकाच घरात ४ मृतदेह पाहून बघणाऱ्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहिला नाही.

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, टेक्सासमध्ये एका १५ वर्षीय युवकाने आई वडील आणि लहान बहिणीची हत्या केली आहे. इतकचं नाही तर त्याने या हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर युवकाने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली आहे. युवकाने त्याच्या ५३ वर्षीय आई जाना कोलबर्गला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच गोळी मारली. त्यानंतर वडील विलियम कॉलबर्ग जे ६३ वर्षाचे होते आणि १३ वर्षीय लहान बहिण एम्मा हिच्या गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर मुलाने घरात दोन पाळीव कुत्रे होते त्यांनाही गोळी घालून मारून टाकलं आहे.

त्यानंतर स्वत:चा जीव घेण्यापूर्वी युवकाने सर्व मृतदेहांचे फोटो ऑनलाईन सोशल मीडियावर पोस्ट केले. हे पाहून त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये अनेकजण हैराण झाले. एका मित्राने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस युवकाच्या घरी पोहचले तेव्हा समोरील दृश्य पाहून सगळेच हादरले. सोशल मीडियावर मृतदेहांचे फोटो शेअर केल्यानंतर आणि स्वत:वर गोळी झाडण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसांनी मुलाचा पत्ता शोधून काढला आणि तात्काळ त्याच्या घरी पोहचली. पोलीस अधिकाऱ्यांनी युवकाला बाहेर येण्याचं आवाहन केले परंतु तो बाहेर आलाच नाही.

यावेळी अचानक गोळीचा आवाज ऐकायला मिळाला त्यानंतर सगळं काही शांत झालं. पोलिसांनी आत जाऊन पाहिलं असता युवकाने स्वत:वर गोळी झाडली होती. घटनेच्या वेळी घराबाहेर आलेले युवकांच्या नातेवाईकांनी सांगितले की, या ह्दयद्रावक प्रकाराची माहिती मिळाल्यावर आम्हाला विश्वास बसला नाही. अखेर युवकाने हा टोकाचं पाऊल का उचललं? याचा शोध घेतला जात आहे. पोलीस सध्या या घटनेची चौकशी करत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसShootingगोळीबार