शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लोकांचे बेडरूममधील खाजगी क्षण बघण्यासाठी 'त्याने' २०० घरातील CCTV केले हॅक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 16:46 IST

असे सांगितले जाते की, ३५ वर्षीय या टेक्निशिअनने साधारण ९६०० वेळा ग्राहकांचं अकाउंट अ‍ॅक्सेस केलं. चला जाणून घेऊ काय आहे पूर्ण प्रकरण.....

सिक्युरिटी सिस्टीम पुरवणाऱ्या एका कंपनीच्या टेक्निशिअनने साधारण २०० घरातील सीसीटीव्ही फुटेज हॅक केले. असं तो करून तो कपल्स आणि सुंदर महिलांच्या खाजगी क्षणांवर लक्ष ठेवू लागला होता. असे सांगितले जाते की, ३५ वर्षीय या टेक्निशिअनने साधारण ९६०० वेळा ग्राहकांचं अकाउंट अ‍ॅक्सेस केलं. चला जाणून घेऊ काय आहे पूर्ण प्रकरण.....

लोकांच्या घरातील सीसीटीव्ह हॅक करण्याची ही घटना अमेरिकेतील टेक्सासमध्ये घडली आहे. टेलिस्फोरो एविल्स नावाचा टेक्निशिअन ADT कंपनीमध्ये कामाला होता. ही कंपनी घरी आणि ऑफिसमध्ये सिक्युरिटी अलार्म सर्व्हिस पुरवते. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये एविल्सला नोकरीहून काढण्यात आलं होतं.

अमेरिकेतील एका कोर्टात सुनावणी दरम्यान गुरूवारी एविल्सने हे मान्य केलं की, तो 'सुंदर' ग्राहकांची जासूसी करत होता. इतकंच नाही तर तो हा कारनामा गेल्या साडे चार वर्षांपासून करत होता. दोषी ठरवल्यावर एविल्सला आथा ५ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.

एविल्स ग्राहकांच्या प्रोफाइलमध्ये आपला ई-मेल आयडी जोडत होता. ज्याव्दारे तो त्यांच्या सीसीटीव्हचा अ‍ॅक्सेस मिळवत होता. तो ग्राहकांचे खाजगी क्षण लाइव्ह बघत होता. एविल्स ग्राहकांना सांगत होता की, सिस्टीम टेस्ट करण्यासाठी त्याला काही वेळासाठी त्याचा ई-मेल आयडी जोडण्याची गरज आहे. अनेक ग्राहकांना तर तो न सांगताही आपला ई-मेल आयडी जोडत होता.

टेक्सासच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, एविल्स आधी एक लिस्ट तयार करत होता की, कोणत्या घरांमध्ये सुंदर महिला राहतात. आणि त्यानुसार त्यांचे खाजगी क्षण लाइव्ह बघत होता. गेल्यावर्षी अनेक ग्राहकांनी कंपनीवर केस करण्याचाही विचार केला होता. 

टॅग्स :Americaअमेरिकाcctvसीसीटीव्हीCrime Newsगुन्हेगारी