शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दहा अधिकाऱ्यांचे पथक करणार परमबीर सिंग यांची चौकशी, अविनाश अंबुरे यांच्याकडे धुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 10:40 IST

Param bir Singh: या संपूर्ण प्रकरणातील आरोपी आणि त्यांच्या आरोपांची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. यामुळे परमबीर सिंग यांच्यापुढील अडचणी आणखी वाढणार आहेत.

ठाणे : बांधकाम व्यावसायिक केतन तन्रा आणि क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल केलेल्या खंडणी प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्तांच्या अधिपत्याखाली दहा अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) निर्मिती ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी गुरुवारी केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील आरोपी आणि त्यांच्या आरोपांची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. यामुळे परमबीर सिंग यांच्यापुढील अडचणी आणखी वाढणार आहेत.

मुंबई तसेच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त दीपक देवराज, एन्काउंटर स्पेशालिस्ट निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, कथित पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता बिनू वर्गीस यांच्यासह २८ आरोपींविरुद्ध केतन तन्ना आणि सोनू जालान यांनी हा खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल केला आहे. खंडणी, पैसे वसुलीसाठी धमकावणे, अशी गंभीर कलमे या गुन्ह्यांमध्ये आहेत. एरव्ही, एखादा पोलीस निरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून अशा गुन्ह्यांचा तपास होतो. मात्र, यात अडकलेले पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह अनेक बड्या अधिकाऱ्यांचा, तसेच खासगी व्यक्तींचाही समावेश आहे. त्यांच्यावर झालेले आरोपही गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक स्थापन करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

यासाठी स्थापन करण्यात आले पथकअत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा तपास करण्यासाठीही एक-दोन नव्हे, तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीमचीच आवश्यकता असल्याचा अभिप्राय काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंह यांच्याकडे नोंदविला होता. याची दखल घेऊन पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या अधिपत्याखाली पाच अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली एसआयटी तपास करणार आहे. या टीमला गरज पडली तर इतरही पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी मदत करायची असल्याचे आयुक्तांनी बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगPoliceपोलिस