शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

रॉबर्ट वाड्रा यांच्या घरी आयकर विभागाचे पथक दाखल, बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी चौकशी सुरु  

By पूनम अपराज | Updated: January 4, 2021 17:21 IST

Income Tax :सूत्रांनी सांगितले आहे की, बीकानेर आणि फरीदाबाद जमीन घोटाळ्याप्रकरणी आयकर विभाग रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करत आहे.

ठळक मुद्दे तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, वाड्रा यांच्या मालकीच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीने ६९.५५ हेक्टर जमीन ७२ लाख रुपयांना विकत घेतली आणि नंतर  एलेगेनी फिनलेज़ ला ५. १५ कोटी रुपयांना विकली. म्हणजेच ४. ४३कोटी रुपयांचा नफा झाला.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात, आयकर विभागाने रॉबर्ट वाड्रा यांना नोटीस पाठविली होती, परंतु ते आयकर कार्यालयात पोहोचले नाही. यानंतर आयकर अधिकारी अधिकारी थेट रॉबर्ट वाड्रा यांच्या कार्यालयात पोहोचले आणि वाड्रा यांचा जबाब नोंदविण्यात येत आहे.आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉबर्ट वाड्रा यांचा जबाब दक्षिण पूर्व दिल्लीतील सुखदेव विहार कार्यालयात नोंदवले जात आहे. सूत्रांनी सांगितले आहे की, बीकानेर आणि फरीदाबाद जमीन घोटाळ्याप्रकरणी आयकर विभाग रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करत आहे.आरोपांनुसार रॉबर्ट वाड्रा यांच्या फर्म सनलाइट हॉस्पिटॅलिटीने राजस्थानमधील बीकानेरमध्ये जमीन घोटाळा केला आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, वाड्रा यांच्या मालकीच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीने ६९.५५ हेक्टर जमीन ७२ लाख रुपयांना विकत घेतली आणि नंतर  एलेगेनी फिनलेज़ ला ५. १५ कोटी रुपयांना विकली. म्हणजेच ४. ४३कोटी रुपयांचा नफा झाला.

रॉबर्ट वाड्रा हे कॉंग्रेसचे अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई आहेत आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याशी त्यांचे लग्न झाले आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे रॉबर्ट वाड्रा आयकर विभागाच्या चौकशीसाठी सहभागी होऊ शकले नसल्याचे सांगितले जात आहे. आयकर व्यतिरिक्त, अंमलबजावणी विभाग (ईडी) रॉबर्ट वाड्राविरूद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे.लंडनस्थित मालमत्ता खरेदीसाठी रॉबर्ट वाड्रावर मनी लाँडरिंगचा आरोप आहे. ब्रायनस्टन स्क्वेअरमध्ये 1.9 दशलक्ष पाउंड किंमतीचे घर विकल्याचा आरोप वाड्रा यांच्यावर आहे. रॉबर्ट वाड्रा सध्या अटकपूर्व जामिनावर आहे.

 

 

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्राIncome Taxइन्कम टॅक्सdelhiदिल्लीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSonia Gandhiसोनिया गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी