शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिकवणी घ्यायला आली अन् चोरी करून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 00:43 IST

मुलीची शिकवणी घ्यायला आलेल्या एका महिलेने संधी साधून घरातील दीड लाखांचे दागिने चोरून नेले. १४ डिसेंबर २०१९ ला घडलेल्या या घटनेची तक्रार बुधवारी अजनी ठाण्यात दाखल करण्यात आली.

ठळक मुद्देअडीच महिन्यांनंतर फुटले बिंग : महिलेला पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलीची शिकवणी घ्यायला आलेल्या एका महिलेने संधी साधून घरातील दीड लाखांचे दागिने चोरून नेले. १४ डिसेंबर २०१९ ला घडलेल्या या घटनेची तक्रार बुधवारी अजनी ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी आरोपी काजल तायडे (वय ३३, रा. मानेवाडा) हिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.अर्चना देवेंद्र पठाडे (वय ३३) या मानेवाडा चौकाजवळच्या विणकर कॉलनीत राहतात. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांचे पती वकिली करतात. गेल्या वर्षी त्यांच्या मुलीला शिकविण्यासाठी काजल तायडे होम ट्यूटर म्हणून पठाडे यांच्याकडे येत होती. १४ डिसेंबरला सकाळी ९ वाजता ती नेहमीप्रमाणे पठाडे यांच्याकडे आली. पठाडे बाथरूममध्ये असल्याची संधी साधून तिने चिमुकलीला चॉकलेट आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पाठविले आणि स्वत: किचनमध्ये शिरली. तेथे आलमारीच्या लॉकरमध्ये असलेले १ लाख ३४,५०० रुपयांचे दागिने काजलने चोरले. मुलगी बाहेरून चॉकलेट घेऊन आली तर पठाडे बाथरूममधून आल्या तेव्हा काजल तेथून निघून गेली. घरात चोरी झाल्याचे लक्षात येऊनही पठाडे दाम्पत्याला तायडेवर संशय आला नाही. शिक्षिका असल्याने ती चोरी करूच शकत नाही, असा त्यांचा समज होता. तो खोटा ठरला. मात्र, तायडेला हुडकेश्वर पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे कळाल्यानंतर पठाडे यांनी तेथे जाऊन बघितले तेव्हा त्यांना चांगलाच धक्का बसला. ती चोरटी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पठाडे यांनी बुधवारी अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. सहायक उपनिरीक्षक आर. जे. पाटील यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :WomenमहिलाtheftचोरीArrestअटक