शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शिक्षकाने विद्यार्थीनीवर बलात्कार केला, २ वर्षे व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल केले; पुढं जे घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 13:47 IST

लखनौमध्ये एका शिक्षकाने नशीला पदार्थ देऊन विद्यार्थीनीवर अत्याचार केले. यानंतर व्हिडीओ केले. या व्हिडीओच्या आधारे तो दोन वर्षे विद्यार्थीला ब्लॅकमेल करत होता.

उत्तर प्रदेश येथील लखनौ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लखनौमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थीनीला नशेचे पदार्थ देऊन लैंगिक अत्याचार केले. यानंतर व्हिडीओ केले. या व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करुन त्या शिक्षकाने विद्यार्थीनीवर पुढील दोन वर्षे बलात्कार करत राहिला. यानंतर त्याच्यावर दबाव आल्यानंतर त्याने विद्यार्थीनीसोबत लग्न केले. दोन वर्षानंतर दुसऱ्याच मुलीसोबत त्याने लग्न केल्याचे समोर आले. 

मिळालेली माहिती अशी, ही घटना २०२३ च्या ऑक्टोंबर महिन्यातील आहे. त्यावेळी ती विद्यार्थीनी इंटरमिजिएटमध्ये शिकत होती. यावेळी भौतिकशास्त्राचे शिक्षक जितेंद्र कुमार शर्मा याने तिला फोन केला. तिला ड्रग्ज दिल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान शिक्षिकाने तिचे अनेक व्हिडिओही बनवल्याचा आरोप  तिने केला आहे. नंतर, त्याने हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबियांना या घटनेबद्दल माहिती दिली. कुटुंबीयांच्या दबावानंतर शिक्षकाने विद्यार्थीनीसोबत लग्न केले.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, या शिक्षकाचे आधीच एक लग्न झाले होते.  ही माहिती तिला मिळाल्यानंतर पीडितेने चौकशी केली. यावेळी शिक्षकाने मारहाण केली आणि घरातून बाहेर काढले. यानंतर शिक्षकाची तक्रार पीडितेने पोलिसात केली. 

पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे, या प्रकरणी शिक्षकाची चौकशी अजूनही सुरू आहे. 

तेलंगणात पतीने केली पत्नीची हत्या

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातून एक भयानक हत्येची घटना समोर आली आहे. एका माजी सैनिकाने आपल्या ३५ वर्षीय पत्नीची क्रूरपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि त्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे तलावात फेकून दिले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, गेल्या शनिवारी (दि.१८) गुरु मूर्ती नावाच्या व्यक्तीने रचकोंडा पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मीरपेट पोलीस ठाण्यात आपली पत्नी वेंकट माधवी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस अधिकाऱ्यांनी गुरु मूर्तीची चौकशी केली. त्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि अनेक धक्कादायक खुलासे केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश