शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दादर परिसरात घरफोड्या करणारा सराईत चोर निघाला 'टॅक्सी चालक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 19:56 IST

पोलिसांनी वरळी कोळीवाड्यातून शैलेशकुमार श्रीनाथ यादव उर्फ लल्लन (वय ४३) याला अटक करण्यात आली आहे. टॅक्सी चालक म्हणून काम करणारा लल्लन हा वरळी कोळीवाडा येथे राहतो.

मुंबई - दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत होती. घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास करणाऱ्या एका सराईत चोरबाबत दादर पोलिसांनी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वरळी कोळीवाड्यातून शैलेशकुमार श्रीनाथ यादव उर्फ लल्लन (वय ४३) याला अटक करण्यात आली आहे. टॅक्सी चालक म्हणून काम करणारा लल्लन हा वरळी कोळीवाडा येथे राहतो. ३१ डिसेंबरपर्यंत लल्लनला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. 

दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लल्लनला ७ घरफोडींच्या गुन्ह्यात अटक केली आहे. ७ पैकी ४ घरफोडी प्रकरणी पोलिसांनी सोनं हस्तगत केलं आहे. तक्रारदार परिहार यांच्या घरातून ८७ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेले होते त्यापैकी पोलिसांनी २७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहे. तर आगलावे यांनी त्याच्या घरातून ४४ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले होते आणि ते सर्व दागिने पोलिसांनी लल्लनकडे सापडले आहेत. डिसोझा यांच्या घरातून ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. त्यापैकी ३२.५ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. तसेच तक्रारदार लांडगे यांच्या घरातील चोरीस गेलेले २ तोळ्याचे सर्व दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

 

टॅग्स :RobberyदरोडाPoliceपोलिसArrestअटक