शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:42 IST

मी खाली काम करत होतो, तेव्हा अचानक मोठा आवाज ऐकला. वरच्या बाजूला पाहिले तर तौफिक माझ्या मुलीवर हल्ला करत होता असं वडिलांनी सांगितले.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील नेहा हत्याकांडाने सगळ्यांनाच हैराण केले आहे. या घटनेतील आरोपी तौफीक नेहाच्या बिल्डिंगमध्ये बुरखा घालून गेला होता. त्याने नेहाच्या वडिलांसमोरच त्यांच्या मुलीला पाचव्या मजल्यावरून धक्का दिला. नेहाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु दुर्दैवाने तिने अखेरचा श्वास घेतला. या प्रकारात आरोपी तौफीकला पोलिसांनी अटक केली आहे परंतु या घटनेचा तपास केला असता वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. 

दिल्लीच्या गुरू तेज बहादूर सिंह हॉस्पिटलबाहेर नेहाचे वडील अत्यंत भावूक अवस्थेत पाहायला मिळाले. त्यांच्या डोळ्यातून पाणी थांबण्याची चिन्हे नाहीत. नेहाचे वडील सुरेंद्र कुमार यांनी सांगितले की, माझ्या मुलीला फक्त न्याय हवा. नेहाने अलीकडेच एका कंपनीत काम करणे सुरू केले होते. ती तिच्या कुटुंबासाठी आशेचा नवा किरण होती. काही काळापूर्वी मलाही एका फॅक्टरीत नोकरी मिळाली होती. आम्हाला भविष्य सुधारेल असं वाटत होते तेव्हाच ही घटना घडली. नेहाला पाचव्या मजल्यावरून खाली ढकलणाऱ्या व्यक्तीचे नाव तौफीक आहे. जो बुरखा घालून आमच्या इमारतीत शिरला होता असं वडिलांनी म्हटलं.

मी खाली काम करत होतो, तेव्हा अचानक मोठा आवाज ऐकला. वरच्या बाजूला पाहिले तर तौफिक माझ्या मुलीवर हल्ला करत होता. मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तौफिकने मलाही दूर ढकलले. मी शेजारीच छतावर पडलो. त्यानंतर तौफीकने माझी मुलगी नेहाला धक्का दिला. त्यात ती पाचव्या मजल्यावरून खाली पडली असा आरोप नेहाच्या वडिलांनी केला आहे. नेहाला ढकलून पळून जाणाऱ्या तौफिकला पकडण्याचा शेजाऱ्यांनी प्रयत्न केला मात्र तो पळून गेला. नेहाने १२ वी पास केली होती. तिला कुटुंबाला आधार द्यायचा होता. 

नेमकं काय होते?

नेहा आणि तौफीक काही वर्षापासून एकमेकांना ओळखायचे. तौफीकने एकदा म्हटले होते, त्याला कुणीही बहीण नाही. नेहा त्याला भाऊ मानायची. त्याच्या हातावर राखी बांधायची. तौफीक कुटुंबातील एक सदस्य म्हणून जवळ आला. त्यानंतर तौफीकला एक बहीण असल्याचे समोर आले. हे समजताच नेहाने तौफीकसोबत बोलणे बंद केले. त्यानंतर तौफीकने तिला त्रास देणे सुरू केले. तौफीक वारंवार नेहाच्या ऑफिसमध्ये फोन करायचा. नेहाने त्याला मला कॉल करू नको असं बजावले होते. अलीकडेच तौफीकने नेहावर लग्नासाठी दबाव टाकला. जर तू माझी झाली नाहीस तर तुला सोडणार नाही अशी धमकीही तौफीकने नेहाला दिल्याचे आईने म्हटले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी