शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तनवीर बनला यश, मॉडेलशी वाढवली ओळख; सुरुवातीला मैत्री त्यानंतर केले प्रपोज, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 08:42 IST

सध्या या प्रकरणी पोलीस गुन्हा नोंद झाला असून मानवीने ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ जारी करत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

भागलपूर - बिहारच्या भागलपूर येथे राहणारी मानवी राज सिंह नाव सध्या चर्चेत आहे. मानवीनं एका मॉडेलिंग एजेन्सीच्या मालकावर लव्ह जिहाद आणि धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकणे, मारहाण करणे, अश्लिल फोटो शेअर करत जीवे मारण्याची धमकी देणे असे आरोप लावले आहेत. एजेन्सीच्या मालकाने सुरुवातीला त्याचे नाव यश म्हणून सांगितले परंतु त्यानंतर त्याचे खरे नाव तनवीर अख्तर खान असल्याचे मानवीला कळाले. 

मानवीचा आरोप आहे की, तनवीरविरोधात आधीही पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. त्यावेळी तनवीरने एक प्रतिज्ञापत्र सादर करत यापुढे तो मला त्रास देणार नाही असं सांगितले. परंतु त्यानंतर पुन्हा तो मला छळायला लागला. मी मुंबईला आली तेव्हा माझ्या मागे तोही आला. मला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिली. मी वर्सोवा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली असून मला आणि माझ्या कुटुंबाला तनवीरपासून जीवाचा धोका आहे असं तिने सांगितले. 

मानवी आणि तनवीरची ओळख कशी झाली?  मानवी राजच्या शिक्षणाची सुरुवात ही डॉन बॉस्को स्कूलमधून झाली. सध्या ती बी कॉमच्या दुसऱ्या वर्षाला आहे. मानवीला मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचे होते. त्यासाठी तिने झारखंड रांची येथील यश मॉडेल एजन्सीशी संपर्क साधला. याठिकाणी मॉडेलिंगबाबत ज्ञान दिले जाते. त्यावेळी तिची ओळख एजन्सी मालक तनवीर अख्तर खानसोबत झाली. तनवीरने मानवीला स्वत:चे नाव यश असल्याचे सांगितले. हळूहळू या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. 

त्यानंतर तनवीरनं मानवीला लग्नासाठी प्रपोज केले. तेव्हा मानवीला यशचे खरे नाव तनवीर अख्तर खान असल्याचे कळाले. ही माहिती मिळताच मानवीने तनवीरसोबत बोलणे सोडले. मात्र तनवीरने तिचा पाठलाग सोडला नाही. मानवीवर लग्नासाठी आणि धर्म परिवर्तनासाठी सातत्याने दबाव टाकत होता. तनवीर मानवीला ब्लॅकमेलिंग करू लागला. मानवीचे अनेक अश्लिल फोटो त्याच्याजवळ होते. तनवीरपासून सुटका व्हावी यासाठी मानवीने रांचीहून मुंबई गाठली. 

सध्या या प्रकरणी पोलीस गुन्हा नोंद झाला असून मानवीने ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ जारी करत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मुंबईहून ही केस रांचीला ट्रान्सफर करण्यात आली आहे. मात्र तनवीरने मानवीचे आरोप फेटाळत म्हणाला की, मानवी माझ्याकडे काम करायची. तिच्यामुळे मला बिझनेसमध्ये नुकसान झाले. त्यासाठी मी तिला भरपाई मागितली. तेव्हापासून ती मला खोट्या केसेसमध्ये अडकवण्यासाठी ब्लॅकमेल करत आहे. मानवीचा बॉयफ्रेंड रवजोत सिंह आणि त्याच्या मित्राने मोबाईल डेटा चोरी करत मला ब्लॅकमेल केले असा दावा केला आहे.