शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस! दैवी शक्तीच्या नावाखाली तांत्रिकाचा अल्पवयीनावर आईच्या समक्षच बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 14:24 IST

घडलेल्या या प्रकारातून सुधारलेल्या समाजात लोक आजही अंधविश्वासाला बळी पडतात याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे.

म्हापसा: तुमच्या मुलीवर संकट आले आहे. आलेले संकट दूर करण्यासाठी, इच्छापुर्ती साठी तसेच तिला दैवीक शक्ती प्राप्त व्हावी यासाठी तिच्यासोबत शरीर घ्यावे लागेल, असे सांगून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलत्कार करण्याचा प्रकार उत्तर गोव्यातील कोलवाळ पोलीस स्तानकाच्या हद्दीत घडला आहे. या बलत्कारातील धक्कादायक घटना म्हणजे सदर प्रकार त्या पिडीत मुलीच्या आईच्या संम्मतीनेतिच्या समक्ष डोळ्यांदेखत घडला आहे. हा अत्यंत निंदनीय तसेच किळसवाणा प्रकार करणाऱ्या भोंदूसाधू किंवा तांत्रिक तसेच या कामात त्याला सहकार्य करणाऱ्या पिडीत मुलीच्या आईला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. तशी माहिती उपअधिक्षक जिबवा दळवी यांनी दिली.  

घडलेल्या या प्रकारातून सुधारलेल्या समाजात लोक आजही अंधविश्वासाला बळी पडतात याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे. या प्रकारानंतर कोलवाळ पोलिसांनी या प्रकरणातील संशयित स्वत:ला तांत्रिक म्हणवून घेणाऱ्या रमाकांत नाईक (५० कान्सा- थिवी) तसेच पिडीत मुलीच्या आईला ताब्यात घेतले आहे. आज बुधवारी संध्याकाळी दोघांनाही रिमांडासाठी न्यायालया समक्ष हजर केले जाणार आहे.

कोलवाळ निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार सोमवारी संध्याकाळच्या सुमाराला घडला. त्या पिडीत मुलीची आई सततपणे त्या तांत्रिकाकडेआपले विविध प्रश्न घेऊन जात होती. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी त्या आईनेआपल्या मुलीलाही सोबत नेले होते.

यावेळी त्या तांत्रिकानेमातेची दिशाभूल करताना मुलीवर विविध संकटे असल्याचे सांगून या संकटांचा नाश करण्यासाठी तिला दैवी शक्ती प्राप्त करुन देण्यासाठी शरीर सुख देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तांत्रिकाने केलेल्या सुचनेला आई बळी पडली व आपल्या पोटच्या मुलीला त्या तांत्रिकाकडे सुपूर्द करण्यास तयार झाली. त्यानंतर त्या आईच्या समक्षच तांत्रिकाने त्या पिडीत मुलीवर बलत्कार केला.घडलेला किळसवाणा प्रकार नंतर दुसऱ्या दिवशी मुलीनेआपल्या वडिलांसमोर कथन केला. मुलीने सांगितलेल्या घटनेवर वडिलही आश्चर्यचकित झाले. त्यांनी लागलीच पोलिसात जाऊन या संबंधीत तक्रार दाखल केली. केलेली तक्रार पोलिसांनी भादंसच्या कलम ३७६, गोवा बाल कायदा २००३ च्या कलम ८ तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४ खाली नोंद करुन घेतला. तक्रारीनंतर पोलिसांनी त्या तांत्रिकाला तसेच पिडीत मुलीच्या आईला अटक केली आहे. पुढील तपास उपअधिक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सोमनाथ माजीक यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक सोनम वेरेकर करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा