शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'तनिष्क' जाहिरातीचा वाद! हल्ल्याची माहिती खोटी, गुजरातच्या शोरूमला आले धमकीचे कॉल

By पूनम अपराज | Updated: October 14, 2020 15:48 IST

'Tanishq' advertisement controversy :अजूनही धमकीचे कॉल येत असल्याची माहिती कच्छ (पूर्व) चे पोलीस अधीक्षक मयूर पाटील यांनी दिली.

ठळक मुद्दे “तनिष्कने जाहीरात प्रदर्शित करुन, हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल कच्छ जिल्ह्यातील तनिष्क शोरूममध्ये असा प्रकार घडला. 

नानाविध दागिन्यांमधील लोकप्रिय ब्राण्ड असलेल्या ‘तनिष्क’च्या गुजरातमधील कच्छ येथील शोरूमवर हल्ला झाला आहे. ‘तनिष्क’च्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणाऱ्या जाहीरातीवरुन हा वादंग निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोल झाल्यामुळे ही जाहीरात ‘तनिष्क’ने मागे घेतली. गुजरातमध्ये ‘तनिष्क’च्या शोरूमवर हल्ला झाल्याची माहिती खोटी असून गांधीधाममध्ये तनिष्क स्टोअरमध्ये दोघेजण आले आणि त्यांनी मॅनेजरला गुजरातीतून माफी मागण्यास सांगितली. दुकान मालकाने मागणी पूर्ण केली आणि माफी मागितली. मात्र, दुकानात अजूनही धमकीचे कॉल येत असल्याची माहिती कच्छ (पूर्व) चे पोलीस अधीक्षक मयूर पाटील यांनी दिली.गुजरातमधील कच्छ येथील गांधीधाम परिसरातील तनिष्क स्टोअरचा मॅनेजर राहुल मनुजा यांनी सांगितले की, स्टोअरवर हल्ला नाही झाला. मात्र, धमकीचे कॉल येत आहेत. पोलीस आम्हाला सहकार्य करत आहेत. “तनिष्कने जाहीरात प्रदर्शित करुन, हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल कच्छ जिल्ह्यातील तनिष्क शोरूममध्ये असा प्रकार घडला. 

 

तनिष्कच्या जाहिरातीत काय होतं ?हिंदू सुनेचे डोहाळे जेवण तिचे मुस्लीम सासू-सासरे करीत असल्याचे दाखविणारी ही जाहिरात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप अत्यंत तीव्रतेने झाल्याने ‘तनिष्क’ने आपली जाहिरात मागे घेतली.  ४५ सेकंदाची ही जाहिरात प्रसारित झाली होती. मुस्लीम सासू सासऱ्यांकडून मुलीसारखे प्रेम मिळणाऱ्या हिंदूू सुनेच्या डोहाळे जेवणाच्या सोहळ्याविषयी सांगणाऱ्या जाहिरातीत या कुटुंबात दोन भिन्न धर्म, संस्कृती, परंपरांचे मीलन झाल्याचे मांडण्यात आले होते. मात्र, काँग्रेसचे खासदार शशी थरूर, अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि कित्येक मान्यवरांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देत असल्याबद्दल या जाहिरातीचे प्रचंड कौतुक केले. मात्र, भाजप नेत्या कोतापल्ली गीता यांनी त्यावर ट्विटरद्वारे टीका केली. समाज माध्यमांवर ही जाहिरात लव्ह जिहादचे उदात्तीकरण करीत असल्याचा आरोप होऊ लागला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या कटू वादानंतर तनिष्कने ही जाहिरात सोशल मीडियावरून मागे घेतली.

टॅग्स :PoliceपोलिसGujaratगुजरातAdvertisingजाहिरात