शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या घरात शौचालय नसल्यामुळं नवविवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 15:25 IST

Tamilnadu : राम्याने आपल्या पतीला राज्यातील राजधानीपासून जवळपास ४ तासांच्या अंतरावर कुड्डालोर शहरात शौचालय असलेले घर शोधण्यासाठी सांगितले होते. यावरून दोघांमध्ये बऱ्याचवेळा वाद झाले होते.

कुड्डालोर : तामिळनाडूमधील कुड्डालोर जिल्ह्यातीत अरिसिपेरियनकुप्पम गावात एका २७ वर्षीय महिलेने आपल्या पतीच्या घरी शौचालय नसल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. येथील एका रुग्णालयात काम करणारी राम्या हिने गेल्या महिन्यात ६ एप्रिलला कार्तिकेयनसोबत लग्न केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर राम्या आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती, कारण तिच्या पतीच्या घरी शौचालय नव्हते. राम्याने आपल्या पतीला राज्यातील राजधानीपासून जवळपास ४ तासांच्या अंतरावर कुड्डालोर शहरात शौचालय असलेले घर शोधण्यासाठी सांगितले होते. यावरून दोघांमध्ये बऱ्याचवेळा वाद झाले होते. राम्याने सोमवारी आत्महत्या केली.  

पोलिसांनी सांगितले की, राम्याला आधी कुड्डालोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पाँडेचरीमधील जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्टग्रॅजुएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये (JIPMER) दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. राम्याची आई मंजुला यांनी तिरुपतीरुपुलियूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राम्या आणि कार्तिकेयन गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी गेल्या महिन्यात सहा एप्रिलला लग्न केले होते. लग्नानंतर राम्या कार्तिकेयनच्या घरी राहायला गेली. त्यावेळी तिला कार्किकेयनच्या घरी शौचालय नसल्याचे समजले. त्यानंतर राम्या लग्नानंतर आठवडाभरानंतर ती आपल्या आई-वडिलांच्या घरी परतली होती.

पोलिसांनी तिच्या आईच्या हवाल्याने सांगितले की, राम्याने तिच्या पतीला सांगितले की, शौचालय बांधल्यानंतरच ती त्याच्या घरी परत येईल. कार्तिकेयनने शौचालयाचे बांधकाम सुरू केले होते, मात्र 6 मे रोजी राम्याची आई कामावरून परतली असता राम्याला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, तिचा मृत्यू झाला. राम्याने कोणतीही सुसाईड नोट लिहिली नाही. मात्र तिच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, राम्या तिच्या पतीच्या घरात शौचालय नसल्यामुळे खुश नव्हती, असे स्थानिक पोलिस निरीक्षक कविता यांनी सांगितले. तसेच, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचेही कविता यांनी सांगितले.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारी