शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला केली अटक; नागपुरात पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 07:24 IST

दिघोरी परिसरात राहत असलेल्या नूरचे वर्तन संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती विशेष शाखेला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी नूरवर नजर ठेवली.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तालिबानी अतिरेक्यांच्या कट्टर समर्थकाला शहर पोलिसांनी जेरबंद केले. नूर मोहम्मद (वय अंदाजे ३० वर्षे) असे या संशयित अफगाणी नागरिकाचे नाव आहे. तो येथे ११ वर्षांपासून बिनबोभाटपणे वास्तव्याला होता. तो तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर फॉलो करीत असल्याचे तपासात उघड झाले. नूरचा मतीन नामक साथीदार अचानक फरार झाल्याने संशय गडद झाला आहे. 

दिघोरी परिसरात राहत असलेल्या नूरचे वर्तन संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती विशेष शाखेला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी नूरवर नजर ठेवली. सोशल मीडियावर तो तालिबानी अतिरेक्यांना फॉलो करीत असल्याचे लक्षात येताच विशेष शाखा व गुन्हे शाखेच्या पथकांनी मंगळवारी नूरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे बनावट कागदपत्रे तसेच ड्रायव्हिंग लायसन्सही मिळाले. तो येथे २०१० पासून वास्तव्याला होता. नूरच्या शरीरातून बंदुकीची गोळी आरपार गेल्याचे निशाण आहे. तो तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर फॉलो करीत असल्याच्या अनुषंगाने चाैकशी करीत असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी सांगितले. अतिरेकी कारवायांमध्ये त्याचा काही सहभाग होता याचाही शोध पोलीस घेत आहेत.   

 साथीदार मतीन फरार n नूर येथे मतीन नामक साथीदारासह राहत होता. हे दोघे २०१० मध्ये नागपुरात येण्यापूर्वी नूर राहत असलेले गाव तालिबानी अतिरेक्यांचा गड मानले जाते. तिथे त्याच्या कुटुंबात आईवडील व दोन भाऊ होते. n आईवडील व एका भावाचा मृत्यू झाला तर दुसरा भाऊ बेपत्ता असल्याचे नूरने सांगितल्याचे समजते. नूरला पकडल्याचे लक्षात येताच मतीन फरार झाल्याने संशय वाढला आहे. n कंबल विकणाऱ्या मतीनने नंतर नागपुरात अवैध सावकारी सुरू केली. तसेच मोठी मालमत्ताही नागपुरात खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. मतीनविरुद्ध २०१७ मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. तो आसाम, मेघालयकडे पळाल्याचा संशय आहे.

रेकी केल्याचा संशयn नागपूर विविध दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर खूप वर्षांपासून आहे. तब्बल ११ वर्षांपासून नागपुरात अवैध वास्तव्य करणाऱ्या नूर आणि मतीनने नागपूरची रेकी करून तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर काही मटेरियल पाठवले का, असा संशय आहे. n त्यामुळे आम्ही कसून चाैकशी करीत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. 

टॅग्स :terroristदहशतवादी