शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

प्लॉट खरेदी-विक्री घोटाळ्याचा सुत्रधार तलाठी चोपडेची अखेर शरणागती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 15:37 IST

खामगाव शहर पोलिसांनी केली अटक

ठळक मुद्दे १८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्याच्या विरोधात शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. २८ एप्रिल २०१९, १८ नोव्हेंबर २०१९ आणि ७ जानेवारी २०२० अशा वेगवेगळ्या फसवणुकीच्या तीन तक्रारी तलाठी चोपडे विरोधात दाखल झाल्यापासून पोलिस त्याचा कसून शोध घेत होते.

खामगाव - शहरातील कोट्यवधी रुपयांच्या प्लॉट खरेदी-विक्री घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार असलेल्या तलाठी राजेश चोपडे याने गुरूवारी दुपारी शहर पोलिसांसमोर शरणागती पत्करली. १८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्याच्या विरोधात शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. तेव्हापासून पोलीस  त्याचा शोध घेत होते. दरम्यान, गुरूवारी दुपारी शहर पोलिसांनी चोपडेला अटक केली.

खामगाव भाग-१ चा तलाठी चोपडे याने त्याच्या कार्यकाळात मुळ हस्तलिखीत ७/१२ मध्ये बनावट नोंदी केल्या. या बनावट नोंदी करून त्या आधारे संगणकीकृत ७/१२ तयार केलेत. दरम्यान, त्याचे कारनामे उघड झाल्यानंतर महसूलच्या काही महत्वपूर्व दस्तवेजाची खाडाखोड आणि पाने फाडल्याचे कृत्य चोपडेने केले. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच  विकाससिंह राजपूत यांनी सुरूवातीला तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या तसेच आणखी एका तक्रारीच्या अनुषंगाने १८ नोव्हेंबर २०१९ रोजी तलाठी चोपडे  रा. खामगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर महसूल प्रशासनाच्यावतीने ७ जानेवारी २०२० रोजी तलाठी राजेश चोपडे याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली. तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी प्राधीकृत अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी सूर्यकांत सातपुते यांची तक्रारीसाठी नेमणूक केली होती. २८ एप्रिल २०१९, १८ नोव्हेंबर २०१९ आणि ७ जानेवारी २०२० अशा वेगवेगळ्या फसवणुकीच्या तीन तक्रारी तलाठी चोपडे विरोधात दाखल झाल्यापासून पोलिस त्याचा कसून शोध घेत होते.चोपडेशी संबंधितांची चौकशीप्लॉट खरेदी-विक्री घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार चोपडेला शोधण्यासाठी पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केले. दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस चोपडे फरार असल्याने चोपडेशी संबंधित तपास एपीआय रविंद्र लांडे यांच्याकडून पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्याकडे सहा दिवसांपूर्वीच वळता करण्यात आला. त्यानंतर पोलीस निरिक्षक अंबुलकर यांनी चोपडेशी संबंधित अनेकांची चौकशी सुरू केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी चोपडेचे विविध बँक खातेही गोठविण्यात आले होते. त्याचा पासपोर्टही लॉक करण्यात आला होता.चोपडेच्या शोधार्थ एक पथक पुण्याततलाठी चोपडे याच्या पुणे येथील वास्तव्याचा पोलिसांकडून सातत्याने शोध घेण्यात येत होता. पाच दिवसांपूर्वीच सहा जणांचे एक पथक पुणे येथे दाखल झाले होते. पीएसआय सोळंके यांच्या नेतृत्वात हे पथक पुण्यात होते. 

फरार तलाठी राजेश चोपडे याला गुरूवारी ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता. त्याच्या शोधासाठी एक पथक पाच दिवसांपूर्वीच पुणे येथेही पाठविण्यात आले होते. - सुनिल अंबुलकर, पोलीस निरिक्षक, शहर पोलीस ठाणे, खामगाव.

टॅग्स :Policeपोलिसkhamgaonखामगावsaleविक्रीfraudधोकेबाजी