शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अभिनेता संदीप नाहरचा मृतदेह घेऊन पत्नीने दोन रुग्णालयांत मारल्या चकरा , पण...

By पूनम अपराज | Updated: February 16, 2021 21:34 IST

Sandeep Nahar Suicide: संदीपला रुग्णालयात मृत घोषित झाल्यानंतर कांचनने पोलिसांना कळविल्याशिवाय मृतदेह आपल्यासोबत घरी नेला होता.

ठळक मुद्दे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी कंचन शर्मा संदीप नहारचा मृतदेह घेऊन दोन रुग्णालयात फिरत राहिली.

बॉलिवूड अभिनेता संदीप नाहरच्या आत्महत्येप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी एक नवीन खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी कंचन शर्मा संदीप नाहरचा मृतदेह घेऊन दोन रुग्णालयात फिरत राहिली. संदीपला रुग्णालयात मृत घोषित झाल्यानंतर कंचनने पोलिसांना कळविल्याशिवाय मृतदेह आपल्यासोबत घरी नेला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपने खोलीच्या दरवाजाला गळफास लावून आत्महत्या केली. हे जेव्हा त्याची पत्नी कंचन यांना समजले तेव्हा त्यांनी कार्पेन्टर यांना दरवाजा तोडण्यासाठी सांगितला. कार्पेन्टरने दार तोडले. त्याच्या पत्नीसह अन्य दोन जणांनी संदीपला पंख्याला लटकलेला असताना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात नेले.

 

Sandeep Nahar Suicide: कोण होता संदीप नाहर? आत्महत्या केल्याचं कळताच काय म्हणाला संदीपचा मित्र

कार्पेन्टरचे स्टेटमेंट महत्वाचे असू शकते

तथापि, आत्महत्येच्या प्रकरणामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यास नकार देण्यात आला. यानंतर त्याला दुसर्‍या रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर कंचनने मृतदेह घरी नेला आणि त्यानंतर पोलिसांना त्याविषयी माहिती दिली असल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला. जेणेकरुन मृत्यूचे कारण कळू शकेल. या प्रकरणात कार्पेंटरने खोलीचा दरवाजा उघडण्याबाबत दिलेला जबाब महत्त्वपूर्ण ठरू शकतो. आज पोलीस त्याचा जबाब नोंदवू शकतात.

 

Sandeep Nahar Suicide: Shocking!, अभिनेता संदीप नहारची हत्या? गळ्यावर जखमा, संशयाची सुई पत्नीवर

आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला

संदीपने आत्महत्या कशी केली हे आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही. डीसीपी विशाल ठाकूर म्हणाले, "संदीपची पत्नी कंचन यांनी संदीपचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले. तिने दोन व्यक्तींच्या मदतीने मृतदेह खाली आणला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळू शकेल. 

कोण होता संदीप नाहर?नीरज पांडे दिग्दर्शित "धोनी: द अनटोल्ड स्टोरी" चित्रपटात सुशांतसिंह राजपूत याच्या मित्राची म्हणजेच परमजित सिंग अर्थात छोटू भैय्याची भूमिका साकारली होती. याच छोटू भैय्यानं धोनीला त्याची पहिली क्रिकेटची बॅट दिली होती. धोनीच्या आयुष्यावरील या चित्रपटातील भूमिकेनंतर संदीप नाहरने अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक कलाकाराची भूमिका केली. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याची मुख्य भूमिका असलेल्या 'केसरी' या चित्रपटात संदीप नाहरने भुट्टा सिंग नावाची सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली होती. संदीप नाहरचा हाच शेवटचा चित्रपट ठरला आहे. संदीप नाहर हा मूळचा चंदीगढचा असून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो अभिनयाच्या क्षेत्रात आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आला होता. 

टॅग्स :sandeep naharसंदीप नहारSuicideआत्महत्याPoliceपोलिसMumbaiमुंबई