शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीला गालबोट : शिवसेना उमेदवाराच्या जावयाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 00:21 IST

कन्हान नगर परिषद निवडणूक दोन दिवसावर आली असताना शिवसेनेचे प्रभाग - ८ चे उमेदवार डायनल शेंडे यांचे जावई संजू खडसे (३५, रा. सत्रापूर, कन्हान, ता. पारशिवनी) यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली.

ठळक मुद्देचाकूने केले वार : नागपूर जिल्ह्यातील कन्हान नगर परिषद निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कन्हान) : कन्हान नगर परिषद निवडणूक दोन दिवसावर आली असताना शिवसेनेचे प्रभाग - ८ चे उमेदवार डायनल शेंडे यांचे जावई संजू खडसे (३५, रा. सत्रापूर, कन्हान, ता. पारशिवनी) यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना कन्हान शहरात सोमवारी रात्री १०.१५ ते १०.३० वाजताच्या दरम्यान घडली.

संजू खडसे हे कन्हान शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील गौरव बारमध्ये एकटेच दारू पित बसले होते. त्यांच्या बाजूला अन्य तिघे दारू पित होते. तिघांना दारू चढल्याने त्यांनी ग्लासची तोडफोड करायला सुरुवात केली. त्यामुळे संजू यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच त्यांच्यात पुन्हा भांडणाला सुरुवात झाल्याने ते बारच्या बाहेर आले. तिथे तिघांनीही संजय यांना जबर मारहाण करायला केली. त्यातच त्यांनी संजूच्या पोट, मांडी व चेहऱ्यावर चाकू व फुटलेल्या बाटलीने वार केले. ते रक्तबंबाळ अवस्थेत कोसळताच तिघांनीही तिथून पळ काढला.माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी संजू यांना लगेच कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना कामठी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. वृत्त लिहिस्तो आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.सीसीटीव्ही फुटेजची तपासणीउपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी लगेच घटनास्थळ गाठून बीअर बार आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. संजू यांचा खून करणारे तिन्ही आरोपी कन्हान येथील रहिवासी असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी आरोपींची नावे मात्र उघड केली नाही. दुसरीकडे संजू यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि नागरिकांनी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयाजवळ गर्दी केली होती. गौरव बार हा बंद करण्यात आल्यानंतरही काहींनी तो उघडायला लावला होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनElectionनिवडणूक