शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

अर्जुन रामपालच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार?, एनसीबी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 19:34 IST

Drug Case : अर्जुन रामपाल एनसीबीविरोधात दावा करण्याच्या तयारीत असल्याचं समजतं आहे.

ठळक मुद्दे एनसीबीच्या छाप्यावेळी अर्जुनने प्रतिबंधित औषधांबाबत डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दाखवलं होतं. मात्र, ते प्रिस्क्रिप्शन जुनं असल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. 

अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबी अटक करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. एनसीबीच्या छाप्यावेळी अर्जुनने प्रतिबंधित औषधांबाबत डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दाखवलं होतं. मात्र, ते प्रिस्क्रिप्शन जुनं असल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. 

अर्जुन रामपालची पुन्हा सहा तास चौकशी, दिल्लीतील डॉक्टरांचा जबाब नोंदविला

 

दरम्यान, अर्जुन रामपाल एनसीबीविरोधात दावा करण्याच्या तयारीत असल्याचं समजतं आहे. आपल्या घरी सापडलेली दोन्ही औषधं डॉक्टरांनी दिलेली असल्याचा अर्जुनने दावा केला आहे. एनसीबीने छाप्यात आपल्या बहिणीची औषधे आणि कुत्र्याची औषधे जप्त केली असल्याचं अर्जुनने म्हटले आहे. 

अर्जुन रामपालची एनसीबी चौकशी करण्याची आली. ही चौकशी सुमारे सहा तास चालली. त्यामध्ये प्रामुख्याने रामपाल हा ड्रग्ज घेणारा ग्राहक आहे की ते पुरवणाऱ्या दलालांच्या टोळीतील सदस्य, याबाबत माहिती घेण्यात आली. या प्रकरणी अर्जुनला दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते, त्याला एनसीबीने २१ डिसेंबर रोजी समन्स बजावले होते. अर्जुन रामपालची १६ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा चौकशी केली गेली. त्यानंतर त्यांची काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे एनसीबीने जप्त केली आणि फॉरेन्सिक्स तपासासाठी पाठविली होती. जप्त उपकरणातून तपास यंत्रणेला काही नवीन पुरावे मिळाल्याची माहिती प्रसारमाध्यमांच्या वृत्तांतून समोर आली आहे. त्यामुळे अर्जुन रामपालची अटक होऊ शकते, अशी माहिती झी २४ तासने दिली आहे. 

अभिनेता अर्जुन रामपालची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) सोमवारी दुसऱ्यांदा सहा तास कसून चौकशी केली. त्याला बंदी असलेले उत्तेजक औषध लिहून दिलेल्या दिल्लीतील संबंधित डॉक्टरांचा जबाब नोंदवून घेतला. बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने रामपाल व त्याची दक्षिण आफ्रिकन गर्लफ्रेंड गॅब्रिएला एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यांना आवश्यकतेनुसार पुन्हा चाैकशीसाठी बाेलावण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Drugsअमली पदार्थArjun Rampalअर्जुन रामपालNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो