शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चिरला गळा अन् तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 20:27 IST

विवाहितेची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू

नाशिक : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मागील काही दिवसांपासून दाम्पत्यामध्ये होणाऱ्या वादाचे पर्यावसन अखेर प्राणघातक हल्ल्यात मंगळवारी (दि.७) झाले. विवाहितेच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करत पतीने गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ झालेल्या पत्नीला बघून त्याने तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेच्या बाल्कनीत धाव घेत खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मखमलाबाद शिवारात भरदुपारी घडली. गंभीररीत्या जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मखमलाबाद शिवारातील रामकृष्णनगर (शांतीनगर) भागात लक्ष्मी रेसिडेन्सी नावाची अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर राजीव रतनसिंग ठाकूर (५०), संध्या राजू ठाकूर (४५) हे दाम्पत्य आपल्या तरुण मुला, मुलीसोबत वास्तव्यास आहेत. राजू ठाकूर हे एका खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरी करतात. तसेच त्यांची मुलेही खासगी नोकरी करतात संध्या या गृहिणी असून, मागील काही दिवसांपासून या दाम्पत्यामध्ये वादविवाद सुरू होते. राजू ठाकूर हे चारित्र्याच्या संशयातून वारंवार विवाहितेसोबत वाद घालत होते. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरात पती-पत्नी हे एकटेच होते. त्यांची मुले कामानिमित्त घराबाहेर गेलेली होती. यावेळी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संशयित राजू याने पत्नीला शिवीगाळ करत वाद घातला आणि चाकूने गळ्यावर वार करत गंभीर जखमी केले. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर घाबरून संशयित राजू याने इमारतीच्या बाल्कनीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. जखमी झालेल्या संध्या ठाकूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मयत संशयित राजूविरुद्ध प्राणघातक हल्ला व आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.