शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 06:35 IST

‘त्या’ घटनेचा तपास एटीएसकडे; गृहमंत्री देशमुख यांची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे/मुंबई : प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांसह सापडलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन (५०) शुक्रवारी मुंब्रा खाडीत मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वेगवेगळे आरोप होऊ लागल्याने स्फोटक प्रकरणाचे गूढ वाढले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकामार्फत (एटीएस) करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी केली. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविण्याची मागणी  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या इमारतीच्या जवळ २४ फेब्रुवारी रोजी एका स्कॉर्पिओत पोलिसांना जिलेटिनच्या कांड्या आढळल्या. ती स्कॉर्पिओ मोटार हिरेन यांच्या मालकीची होती. १७ फेब्रुवारी रोजी हिरेन हे आपल्या दुकानातील खरेदीकरिता विक्रोळी येथे गेले असता त्यांच्या मोटारीचे हँडल लॉक झाले. त्यामुळे मोटार विक्रोळी येथे ठेवून ते ठाण्यात आले व त्याच दिवशी मेकॅनिक घेऊन ते विक्रोळीत गेले, तर त्यांना तेथे आपली मोटार जागेवर नसल्याचे आढळले. त्यामुळे विक्रोळी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी वाहन चोरीची तक्रार दाखल केली. २४ फेब्रुवारी रोजी अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवण्याकरिता त्याच मोटारीचा वापर केला गेला होता. त्यामुळे गेले काही दिवस दहशतवादविरोधी पथक व मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी हिरेन यांना चौकशीला बोलावत होते. अलीकडे एक दिवस हिरेन हे असेच चौकशीकरिता गेले व दुसरे दिवशी सकाळी परतले होते. त्यामुळे हिरेन हे पोलिसांना चौकशीत सहकार्य करीत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना ठाऊक होते. स्कॉर्पिओ विक्रोळी येथे बंद पडली. त्या वेळी कार तेथेच सोडून कॅबने क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेलेले मनसुख मार्केटमध्ये कोणाला भेटले? याबाबत उलटसुलट चर्चा आहेत.

हिरेन हे गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता तीन पेट्रोल पंप परिसरातील क्लासिक या आपल्या दुकानात बसले असता त्यांना फोन आला. या वेळी दुकानात त्यांचा थोरला मुलगा मित हजर होता. त्याला हिरेन म्हणाले, कांदिवलीच्या तावडे साहेबांचा फोन होता. त्यांना भेटायला मी जात आहे. दुकानातून निघालेले हिरेन हे डॉ. आंबेडकर रोड येथील विकास पाम येथील आपल्या १४०१ क्रमांकाच्या निवासस्थानी आले व तेथून ८.०० ते ८.१५ वाजता बाहेर पडले. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजले तरी हिरेन घरी न आल्याने व त्यांचा मोबाइल लागत नसल्याने त्यांची पत्नी विमला (४६), पुत्र मित, लय (१६) व वंश (१२) हे काळजीत पडले. त्यामुळे त्यांनी नौपाडा पोलीस ठाणे गाठून वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

मुंब्रा येथे शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता एक मृतदेह तेथील पोलिसांना सापडला. त्या मृतदेहावर   कुठल्याही जखमा नसल्याचे पोलिसांनी सांगितले. नौपाडा पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी हिरेन कुटुंबाला त्या मृतदेहाची छायाचित्रे दाखवली असता हिरेन  कुटुंबाला धक्का बसला. हिरेन यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा पोलिसांचा दावा त्यांचे कुटुंबीय व मित्र यांना मान्य नाही. आता पोलीस हिरेन यांच्या निवासस्थान व दुकान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळत आहेत. हिरेन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज इस्पितळात करण्यात आले.

सचिन वाझे यांची ठाण्यात हजेरी

अंबानी यांच्या घराजवळील स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे हे करीत होते. मात्र, अलीकडेच हा तपास सहायक पोलीस आयुक्त नितीन अलकनुरे यांच्याकडे सोपविण्यात आला. मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याचे कळताच वाझे तेथे हजर झाले. त्यामुळे तर्कवितर्कांना ऊत आला.

‘मी घटनास्थळी सर्वांत आधी पोहोचलो नव्हतो’

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्कॉर्पिओ सापडली तेव्हा स्थानिक पोलिसांच्या आधी सचिन वाझे घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप केला आहे. हा आरोप फेटाळत वाझे म्हणाले की, 'माझ्या आधी तिथे अनेक यंत्रणा गेल्या होत्या. गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक एसीपी, डीसीपी झोन-२ आणि बीडीडीएसचे पथक आधी पोहोचले होते. त्यानंतर क्राइम ब्रँचचे युनिट पोहोचले. त्यात मी होतो.

    मुंब्रा खाडीत आढळला मृतदेहn मनसुख हिरेन गुरुवारी सायंकाळी ठाण्यातील तीन पेट्रोल पंप परिसरातील आपल्या दुकानात असताना त्यांना एक फोन आला. n ‘कांदिवलीच्या तावडे साहेबांना भेटायला घोडबंदरला जातोय,’ असे मुलगा मितला (२०) सांगून हिरेन हे दुकानातून बाहेर पडले. n शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता मुंब्रा पोलिसांना खाडीत त्यांचा मृतदेह सापडला. n हिरेन यांचा मृतदेह खाडीतून बाहेर काढला तेव्हा त्यांच्या तोंडात बरेच रुमाल कोंबल्याचे आढळले.    पोहता येणाऱ्याचा बुडून मृत्यू कसा?दररोज पोहायला जाणारे हिरेन यांचा खाडीत बुडून मृत्यू कसा होऊ शकतो? असा संशय त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवाराने व्यक्त केला आहे. 

जे काही सत्य आहे ते समोर येईल. मुंबई पोलिसांसह सर्वच तपास यंत्रणा याचा तपास करीत आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या ठाणे पोलिसांकडूनही माहिती घेण्यात येत आहे.    - परमबीर सिंह, मुंबई पोलीस आयुक्त

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीBombsस्फोटकेPoliceपोलिस