शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मेकअप आर्टिस्टचा संशयास्पद मृत्यू, खार पोलिस आणि गुन्हे शाखेकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 06:44 IST

कोणीतरी तिची हत्या करून गळफास लावल्याचा संशयही कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. खार पोलिस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.

मुंबई : सारा यंथन (२६) ही चित्रपटसृष्टीतील मेकअप आर्टिस्ट  मंगळवारी रात्री खार दांडा येथील ती भाड्याने राहात असलेल्या फ्लॅटमध्ये हातावर जखमा तसेच रक्तबंबाळ स्थितीत मृतावस्थेत पंख्याला लटकलेली आढळली. कोणीतरी तिची हत्या करून गळफास लावल्याचा संशयही कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. खार पोलिस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.

मूळची नागालॅंड येथील सारा यंथन ही मुंबईत चित्रपट, टेलिव्हिजन आणि वेबसीरिजमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती. बँकेत काम करणाऱ्या एका इसमासोबत संबंध होते आणि तो तिला लग्नासाठी बळजबरी करत होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

रविवारी सकाळपासून सारा  फाेनला प्रतिसाद देत नव्हती. तिच्या फ्लॅटच्या भाड्याची रक्कम थकलेली असल्याने सोमवारी एजंट भाड्यासाठी पुन्हा तिच्या घरी गेला तेव्हा त्याला संशय आला. त्याने तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.  सोमवारी रात्री खार पोलिसांनी दरवाजा तोडला, तेव्हा सारा बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सापडली. पोलिसांना तिच्या दोन्ही हातावर कापल्याच्या खुणाही आढळल्या. 

पोलिसांनी नागालँडमध्ये राहणारी मृत साराची आई रोझी यांच्याशी संपर्क साधला. त्या मंगळवारी मुंबईत आल्या. खार पोलिसांनी मंगळवारी दुपारी कूपर हॉस्पिटलमध्ये सारा यंथनचे पोस्टमॉर्टम केले आणि मृतदेह तिच्या आईकडे सोपवला.रोझी म्हणाल्या की, रिझर्व्ह बॅंकेत काम करणाऱ्या एका व्यक्तीसोबतच्या नात्याबद्दल तिने शेअर केले होते. तो माणूस लग्नासाठी जबरदस्ती करत आहे, असे तिने सांगितले हाेते. 

बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडली  बेडरूममध्ये ती रक्ताच्या थारोळ्यात सापडली. तिला कोणीतरी मारून नंतर फासावर लटकवल्यासारखे दिसत आहे. मला संशय आहे की तिची हत्या झाली आहे आणि पोलिसांनी याची चौकशी करून माझ्या मुलीला न्याय द्यावा, असे रोझी यांनी स्पष्ट केले. पोलिस शवविच्छेदनाच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी