शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

डेटिंग अ‍ॅपवर प्रेम, त्यानंतर ब्रेकअप मग बॉयफ्रेंडच्या घरी एअर होस्टेसचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 13:59 IST

२८ वर्षीय एअर होस्टेस अर्चना धीमान काही दिवसांपूर्वी डेटिंग APP द्वारे इंजिनिअर आदिशला भेटली. हळूहळू दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले.

बंगळुरू - कर्नाटकची राजधानी बंगळुरूतून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी चौथ्या मजल्यावरून पडून एअर होस्टेसचा मृत्यू झाला. एअर होस्टेस ही तिच्या बॉयफ्रेंडच्या घरी होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. सध्या युवतीच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. बॉयफ्रेंडनं एअर होस्टेसची हत्या केल्याचा संशय आहे त्यामुळे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. 

२८ वर्षीय एअर होस्टेस अर्चना धीमान काही दिवसांपूर्वी डेटिंग APP द्वारे इंजिनिअर आदिशला भेटली. हळूहळू दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. परंतु काही दिवसांत भांडण झाले. दोघांच्या नात्यात वितुष्ट आले. त्यानंतर अर्चनाने दुबईहून बंगळुरू गाठत नाते संपवण्याचा निर्णय घेतला.  पोलिसांच्या माहितीनुसार जेव्हा अर्चना बॉयफ्रेंड आदिशला भेटण्यासाठी त्याच्या फ्लॅटवर पोहचली. तेव्हा तिचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. अर्चनाच्या मृत्यूनंतर आदिशने पोलिसांना सूचना दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. परंतु तपासानंतर ही हत्याचा असल्याचा संशय आला. अर्चना धीमान ही हिमाचलच्या धर्मशाळा इथं राहणारी होती तर आदिश केरळला राहायचा. दोघांमध्ये डेटिंग App वरून बोलणे झाले. सुरुवातीला आदिशने पोलिसांना सांगितले की, दोघांमध्ये भांडण झाले त्यानंतर अर्चनाचा खाली पडून मृत्यू झाला मात्र ही हत्या असावी असं वाटल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासात गती आणली आहे. 

दरम्यान, अर्चना बंगळुरूमध्ये एअर होस्टेस होती. त्यानंतर इंटरनॅशनल कंपनीत ती एअर होस्टेस म्हणून कामाला लागली. त्यानंतर आदिश आणि दोघांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात मग त्यानंतर झालेल्या भांडणातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अर्चना आदिशच्या फ्लॅटवर गेली होती. ज्या जागेवरून अर्चनाचा पडून मृत्यू झाला तेथून उडी मारणे सोप्पे नाही. त्यामुळे पोलिसांनी आदिशला ताब्यात घेतले आहे. चौकशीत दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्याने मान्य केले. तसेच भांडण झाल्याचेही कबुल केले.