शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

गोव्याच्या ड्रग व्यवसायात नायजेरियन नागरिकांचा सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 18:12 IST

अटक केलेल्या 31 विदेशी नागरिकांपैकी 21 जण नायजेरियन; पहिल्या दहा महिन्यात 173 प्रकरणात एकूण 182 संशयितांना अटक

सुशांत कुंकळयेकरमडगाव - गोव्यात पर्यटन मौसम सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा ड्रग्सचे व्यवसायिक किनारपट्टी भागात सक्रीय झालेले असून उत्तर गोव्यात नायजेरियन ड्रग पेडलर्सचा सुळसुळाट वाढलेला आहे. आतापर्यंत या वर्षाच्या दहा महिन्यात गोव्यात एकंदर ड्रग्सच्या व्यवसायात असलेल्या 31 विदेशी नागरिकांना अटक केलेली असून त्यापैकी 21 नागरीक नायजेरियाचे आहेत.अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पोलीस कार्यालयातून मिळालेल्या माहितीप्रमाणे 1 जानेवारी ते 15 ऑक्टोबर 2018 या कालावधीत गोव्यात एकूण 173 ड्रग विक्रीची प्रकरणं उजेडात आली असून त्यात आतापर्यंत 182 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये 55 गोमंतकीय, 96 बिगर गोमंतकीय भारतीय तर 31 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. आतारपर्यंत केलेल्या कारवाईत गोव्यातील वेगवेगळ्या भागात तब्बल अडीच कोटी रुपयांचा माल पकडलेला आहे.ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांतच 10 अमली पदार्थाची प्रकरण उजेडात आली असून यातील बहुतेक प्रकरणं कळंगूट, बागा, अंजुणा आणि वागातोर या पट्टय़ात असून या प्रकरणात दहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात एका नायजेरियनासह दोन विदेशी नागरिकांचा समावेश असून दोन हिमाचलच्या नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय तामिळताडू, गुजरात, कर्नाटक यासह तीन गोमंतकीय तरुणांचा समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, यंदा सर्वात मोठय़ा प्रमाणावर अटक झालेल्यामध्ये नायजेरियन नागरिकांचा अधिक समावेश असून 16 मे रोजी अंजुणा येथे केलेल्या कारवाईत इङोक कालेची या नायजेरियनाकडून एलएसडी, अ‍ॅक्टसी व केटोमाईनचा 7.30 लाखांचा अमली पदार्थ सापडला होता.10 जुलै रोजी बागा येथे जॉय एङोमिनो या नायजेरियन नागरिकास अटक केली असता त्याच्याकडे पाच लाखांचा चरस आढळून आला होता. 30 एप्रिलला मोरजी येथे फैज सय्यद या आणखी एका नायजेरियनला अटक केली असता त्याच्याकडे 6.40 लाखाचा गांजा सापडला होता.

मिळालेल्या माहितीप्रमाणे गोव्यातील ड्रग व्यवसायात फ्रेंच व रशियन नागरिकांचाही समावेश असून 16 जानेवारी रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाने अंजुणा येथे स्टिफन जॅकीस या 50 वर्षीय फ्रेंच नागरिकाला अटक केली असता त्याच्याकडे 18 लाखांचे कॉकटेल ड्रग्स सापडले होते. यातील विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ही कारवाई होण्यापूर्वी मागची 17 वर्षे या इसमाचे गोव्यातच वास्तव होते. 21 जुलै रोजी शिवोली येथे मॅक्सीम मॉस्कोचेव्ह आणि ऑस्टीन सेर्जीओ या दोन रशियनांना गुन्हे शाखेने अटक केली असता त्यांच्याकडे 30 किलो गांजा सापडला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत दहा लाख असून शिवोलीतच या गांजाची लागवड केली जात होती हेही उघडकीस आले आहे.

गोव्यात हा अमली पदार्थाचा व्यवसाय एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर फोफावलेला आहे की त्यात आता स्थानिकही मोठय़ा प्रमाणावर सामील झालेले आहेत.1 फेब्रुवारी रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाने कुठ्ठाळी येथे मध्यरात्री केलेल्या कारवाईत तिळामळ-केपे येथील व्हॅली डिकॉस्ता या स्थानिक युवकाला अटक केली असता त्याच्याकडे 4.85 लाखाचे अमली पदार्थ सापडले होते. 16 फेब्रुवारी रोजी अंजुणा येथे टाकलेल्या धाडीत मिनीन फर्नाडिस या स्थानिकाकडे साडेसात लाखाचे कोकेन तर त्याच दिवशी हरमल येथे टाकलेल्या धाडीत अशोककुमार या 23 वर्षीय बिहारी युवकाकडे साडेचार लाखाचा चरस सापडला होता. 3 सप्टेंबर रोजी अंजुणा येथे प्रविण पंडीत या 25 वर्षीय बिहारी युवकाला अटक केली असता त्याच्याकडेही 6.75 लाखांचा गांजा सापडला होता.गोव्यात पर्यटन मौसम सुरु झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसात ज्या कारवाया करण्यात आला.  त्यात वागातोर येथे लाल दास या हिमाचलच्या युवकाला 4 ऑक्टोबर रोजी अटक केली असता त्याच्याकडे साडेपाच लाखाचा चरस सापडला होता. त्याच दिवशी कळंगूट पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रणव पटेल या 29 वर्षीय गुजराती युवकाकडे 1.30 लाखांचा चरस व कोकेन सापडला होता. 5 ऑक्टोबरला अमली पदार्थ विरोधी पथकाने हरमल येथे मोहन लाल या कुल्लूच्या युवकाला अटक केली असता त्याच्याकडे एलएसडी व चरस असा 5.65 लाखाचा अमली पदार्थ सापडला होता. तर 7 सप्टेंबरला दाबोळी विमानतळावरुन मस्कतला जाणाऱ्या विमानात बोर्डिंग करण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या अल फरहान याच्याकडे तब्बल 8 लाखांचा चरस सापडला होता. यंदा विमानतळावर ड्रग्स जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई होती.पर्रा, अंजुणा नायजेरियन नागरिकांची मुख्य ठिकाणंगोव्यात ड्रग व्यवसायात असलेले बहुतेक नायजेरियन नागरिकांचे उत्तर गोव्यातील बागा, पर्रा आणि अंजुणा या भागातच जास्त वस्ती असून या तिन्ही ठिकाणी या नागरिकांच्या विशेष वस्त्याही आहेत. यातील बहुतेक नायजेरियन शिकण्याच्या बहाण्याने किंवा फुटबॉलपटू म्हणून गोव्यात आले होते. मात्र मागची कित्येक वर्षे गोव्यात त्यांचे बेकायदेशीर वास्तव्य चालूच आहे. काही वर्षापूर्वी पर्रा भागातील नायजेरियनांनी पर्वरी येथे मोठा राडा केल्याने त्यांच्या या वस्त्यांवर कारवाई सुरु झाली होती त्यानंतर काहीजणांनी मोरजी व हरमल भागात तर काहीजणांनी शिवोली भागात स्थलांतर केले. रंगाने काळे असलेले हे नायजेरियन पटकन ओळखू येत नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून त्यांची तपासणीही कडक होत नाही. त्याचाच फायदा घेऊन त्यांनी आजर्पयत गोव्यात आपले ठाण मांडले आहे अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.गोव्यात येणारे अमली पदार्थ राज्याच्या बाहेरुन येतात असा समज होता. मात्र, या समजाला छेद देणारे दोन घटना यंदाच्या वर्षी झाल्या. 11 जून रोजी पिसुर्ले-सत्तरी येथील औद्योगिक वसाहतीतील एका फॅक्टरीवर धाड घातली असता, तिथे जवळपास 308 किलो केटामाईन हा अमली पदार्थ सापडला होता. या कारवाईत तीन विदेशी नागरिकांसह दहा जणांना अटक केली होती. या घटनेमुळे अमली पदार्थाचे उत्पादन गोव्यातच होत असल्याचे उघडकीस आले होते. 21 जुलैला शिवोली येथे अशीच धाड घातली असता गोव्यात वास्तव्य करुन रहाणारे दोन रशियन या भागात गांजाची शेती करत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावरुन गोवाही अमली पदार्थाचे उत्पादन करणारे राज्य अशी प्रतिमा तयार झाली होती.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Narcotic Cellअमली पदार्थविरोधी पथकgoaगोवा