शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राने डॉक्टर मित्राला दिली क्रूर शिक्षा, आधी गळा दाबला, मग... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 18:33 IST

Crime News: मध्य प्रदेशमधील एका डॉक्टरचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. दरम्यान पोलिस तपासामध्ये ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले आहे.

रायपूर - छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये तीन दिवसांपूर्वी हॉटेलच्या एका खोलीत मध्य प्रदेशमधील एका डॉक्टरचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. दरम्यान पोलिस तपासामध्ये ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले आहे. गुरुनानक चौकातील हॉटेल संदीपच्या खोलीमध्ये मध्य प्रदेशमधील शहडोल येथील डॉक्टर जितेंद्र विश्वकर्मा यांच्या संशयास्पद परिस्थितीत झालेल्या मृत्यू प्रकरणी शॉर्ट पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर हा खुलासा झाला आहे. डॉ. जितेंद्र यांनी गळफास लावून आत्महत्या केली नाही. तर त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये थांबलेला त्यांचा मित्र अजय निषाद याने त्यांची गळा आवळून हत्या केली होती. तसेच हत्या केल्यानंतर आरोपीने त्यांचा मृतदेह फासावर लटकवला होता. (Suspicion of having illicit relationship with mother, friend Murder doctor friend )

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अजय त्याच्या बहिणीची गुणपत्रिका रिन्युअल करून घेण्यासाठी जितेंद्र यांना घेऊन रायपूरमध्ये आला होता. दरम्यान, हत्येच्या घटनेपूर्वी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्या वादातून अजयने जितेंद्र यांची हत्या केली. हॉटेलचे मॅनेजर आणि तिथे असलेल्या अन्य लोकांनी या दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अजय निषाद याच्या आईचे डॉ. जितेंद्र विश्वकर्मा यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून त्यांच्यामध्ये वादही झाला होता. मात्र जितेंद्र यांनी असे काही नसल्याचे सांगत आरोपीची समजूत काढत होता. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी तपासादरम्यान, पोलिसांना याबाबत माहिती दिली होती.

डॉक्टर जितेंद्रची हत्या केल्यानंतर अजय हॉटेलच्या खोलीला बाहेरून बंद करून निघून गेला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीनेच काचेच्या तुकड्याने दोरी कापून जितेंद्र यांचा मृतदेह खाली उतरवला होता. आता पोलिसांनी या घटनेत नवी माहिती समोर आल्यानंतर आरोपी अजय निषाद याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशChhattisgarhछत्तीसगड