शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

संतापजनक! चारित्र्यावर संशय घेत ग्रामपंचायतीने बलात्कार पीडितेला केले हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 12:14 PM

Beed Crime News : पीडित महिलेच्याच चारित्र्यावर संशय घेत ग्रामपंचायतीने तिला गावातून हद्दपार करण्याचा ठराव मंजूर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देपीडित महिलेवर गावातील चार जणांनी काही वर्षांपूर्वी बलात्कार केला होतात्यानंतर आरोपींविरोधात खटला चालून न्यायालयाने संबंधितांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होतीया प्रकरणात न्यायालयाने पीडितेच्या बाजूने न्याय दिल्यानंतरही गावातून सदर महिलेला त्रास देण्यास सुरुवात झाली

बीड - बलात्कार पीडित महिलेला मानसिक आधार द्यायचे राहिले दूर, पीडित महिलेच्याच चारित्र्यावर संशय घेत ग्रामपंचायतीने तिला गावातून हद्दपार करण्याचा ठराव मंजूर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडली आहे. दरम्यान, पीडित महिलेला विरोध करत या गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या दिल्याचेही समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेवर गावातील चार जणांनी काही वर्षांपूर्वी बलात्कार केला होता. त्यानंतर आरोपींविरोधात खटला चालून न्यायालयाने संबंधितांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र ही बाब गावकऱ्यांना रुचली नव्हती. या प्रकरणात न्यायालयाने पीडितेच्या बाजूने न्याय दिल्यानंतरही गावातून सदर महिलेला त्रास देण्यास सुरुवात झाली.

धक्कादायक बाब म्हणजे गावातील ग्रामपंचायत तसेच ग्रामसेवक, सरपंच आदी मंडळीही या महिलेविरोधात उभे राहिले. सदर महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला आणि तिच्या कुटुंबीयांना गावातून हाकलण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला.हे कमी म्हणून की काय, या गावामधील ग्रामस्थांनी सदर महिलेविरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊनही गोंधळ घातला. पीडित महिलेला मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला. या जमावाच्या तावडीतून सदर पीडित महिला आणि तिची मुले कशाबशा जीव वाचवून बाहेर पडल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारBeedबीडgram panchayatग्राम पंचायत