शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संशियत दहशतवादी प्रकरण; चौघांना वसई कोर्टाने ठोठावला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 13:08 IST

निर्देश न पाळल्याने नालासोपारा पोलिसांनी चार लोकांवर गुन्हा दाखल केला होता.

ठळक मुद्देगुन्हा दाखल झाल्यानंतर हिंदी चित्रपटाचे शुटींगही त्याच दिवशी गुंडाळण्यात आले होते. न्यायाधीश एस. बी. पवार यांनी प्रत्येकी १२०० रुपये प्रमाणे चोघांना ४ हजार ८०० रुपये दंड ठोठावला आहे.

मंगेश कराळे

नालासोपारा - नालासोपारा पश्चिमेकडील गास परिसरातील सनसिटी येथे कोणतेही शिर्षक नसलेल्या हिंदी चित्रपटाचे शुटींग सुरू असल्याने रीतसर पोलिसांकडून परवानगी घेतली होती. मात्र, निर्देश न पाळल्याने नालासोपारा पोलिसांनी चार लोकांवर गुन्हा दाखल केला होता. त्या चौघांना गुरुवारी वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दंड ठोठावला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास वसई पश्चिमेकडील पंचवटी नाका येथे लांब दाढी, रंग गोरा, आर्मीसारखे टीशर्ट, काळी पॅन्ट, तोंडाला रुमाल, पोटावर मॅगझिनसारखे दिसणारे पॉकेट, हातावर आयसिसच्या झेंड्यामधील असलेले पान अशा वेशभूषेतील दहशतवादीसारखा दिसणारा संशियत तरुण दिसल्यानंतर संपूर्ण पालघर जिल्ह्यासह वसई तालुक्यात खळबळ झाली होती. अंबाडी रोडवरील भारत बँकेचे सुरक्षा रक्षक अनिल रामदास महाजन यांनी त्याला पाहिले व पालघर कंट्रोलमध्ये कळवल्यानंतर संपूर्ण पालघर जिल्ह्यातील पोलिसांनी एक तास फिल्मी स्टाईलने धावपळ करत सत्य परिस्थिती लोकांसमोर उघडकीस आणली व सुटकेचा श्वास पोलिसांनी टाकला होता. नालासोपारा पोलिसांनी आर्टिस्ट बलराम धुलाराम जितावल (२३), आर्टिस्ट अरबाज रझ्झाक खान (२०), हिमालय हृदयनाथ पाटील (२७) आणि युनिट इंचार्ज दत्ताराम सखाराम लाड (३८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तपास अधिकारी पोलीस नाईक नितीन पाटील यांनी या चौघांना वसई न्यायालयात गुरुवारी हजर केले. न्यायाधीश एस. बी. पवार यांनी प्रत्येकी १२०० रुपये प्रमाणे चोघांना ४ हजार ८०० रुपये दंड ठोठावला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंदी चित्रपटाचे शुटींगही त्याच दिवशी गुंडाळण्यात आले होते.  

या चारही जणांनी सार्वजनिक सुरक्षतेत धोका निर्माण केला व त्यांना जी चित्रपट शूटिंग करण्यासाठी परवानगी दिली होती त्याच्या अटी व शर्तीचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल केला होता. त्या चौघांना वसई न्यायालयाने दंड ठोठावला आहे. - वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे 

टॅग्स :Courtन्यायालयterroristदहशतवादीPoliceपोलिसVasai Virarवसई विरार