शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

साधुच्या वेशातील एका इसमाच्या खुनाचा गुंता सुटला, संशयित आरोपी अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 21:42 IST

संशयिताला अटक केली असून, पुढील तपास चालू असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.

 मडगाव - गोव्यातील मडगाव शहरात मागच्या आठवडयात घडलेल्या एका खून प्रकरणाचा गुंता सुटला असून, पोलिसांनी या खून प्रकरणात अमजद खान उर्फ निग्रो (१८) याला अटक केली आहे. पैशासाठी हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. संशयित मूळ कर्नाटकातील मंडया येथील रहिवाशी असून, तो भंगारगोळा करण्याचे काम करतो. शुक्रवारी रात्री रेल्वेतून आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी तो रेल्वे स्थानकावर आला असता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सीसीटिव्ही कॅमेराच्या मदतीने पोलीस खुन्यापर्यंत पोहचू शकले.संशयिताला अटक केली असून, पुढील तपास चालू असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.मंगळवारी रात्री मालभाट येथील यल्लम्मा घुमटीजवळ खुनाची घटना घडली होती. बुधवारी सकाळी तेथे साधुच्या वेशातील एक इसम मृतावस्थेत सापडला होता. मृतदेहाजवळ दारुची एक बाटलीही सापडली होती. खून म्हणून मडगाव पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते.सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास सुरु केला असता, एका युवकाने मयताच्या डोके दगडाने चेपल्याने हा खून झाल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी तपास चालू करुन शुक्रवारी रात्री संशयित अमजद याला पकडले. त्याने आपल्या गुन्हयाची कबुली दिली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.संशयिताला पैसे पाहिजे होते. पहाटे साडेचारच्या दरम्यान तो फिरत यल्लम्मा घुमटीजवळ पोहचला असता, तेथे त्याला साधुच्या वेशात एक इसम सापडला, त्याच्याकडे पैसे मागितले असता, त्याने नकार दिला. नंतर चिडून त्याने दगडाने त्याचे डोके चेपले व पैसे घेउन तो पळून गेला. संशयिताला व्हायटनर द्रव्य हुगंण्याचे व्यसन आहे असे पोलिसांनी सांगितले. संशयित रेल्वे स्टेशन परिसरात रहात होता. खुनाच्या घटनेनंतर तो दोन दिवस याच भागात होता. नंतर शुक्रवारी रात्री तो कोकण रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर रेल्वेतून गावी जाण्यासाठी आला असता, एलआयबी पोलीस पथकाचे पोलीस गोरखनाथ गावस यांनी त्याला पकडले. या खूनाचा सीसटिव्ही कॅमेराच्या माध्यमातून माग काढण्यासाठी पोलीस शिपाई अविनाश नाईक यांनीही मोलाची कामागिरी केली अशी माहिती पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.दरम्यान या खून प्रकरणातील मयताची ओळख अजूनही पटू शकली नाही. मृतदेह गोवा वैदयकीय महाविदयालय इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलीस तपास चालू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा