शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतच्या व्यसनाची त्याच्या कुटुंबीयांना पूर्वकल्पना हाेती, रिया चक्रवर्तीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 06:42 IST

rhea chakraborty : रियाने असेही म्हटले आहे की, या ड्रग्जमुळे त्याचा मृत्यू झाला असता. त्याची बहीण मीतू, ८ ते १२ जूनदरम्यान त्याच्यासोबत होती. मी मुंबई पोलिसांनाही ही गोष्ट सांगितली आहे.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतला ड्रग्जचे व्यसन असल्याची त्याच्या कुटुंबीयांना पूर्वकल्पना होती. अनेकदा त्याची बहीण, मेहुणा सिद्धार्थ त्याच्यासाठी गांजा घेऊन येत आणि स्वतःही घेत होते, अशी माहिती सुशांतची प्रेयसी व या प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती हिने दिली.अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) दाखल केलेल्या आरोपपत्रात रियाचा जबाब नमूद आहे. त्यात तिने सुशांतच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले. गेल्यावर्षी १४ जूनला त्याचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला हाेता. एनसीबीला दिलेल्या जबाबात रियाने म्हटले की, सुशांतची प्रकृती अधिकच बिकट होत चालली होती, म्हणून शोविक (रिया चक्रवर्ती हिचा भाऊ) चिंतेत होता. ८ जून २०२० रोजी सुशांतची बहीण प्रियंकाकडून एक व्हाॅट्सॲप मॅसेज आला. यात उल्लेख होता की, लिब्रियम १० एमजी, नेक्सिटाे, ही बंदी असलेली औषधे त्याला द्यावीत, कार्डियोलॉजिस्ट डॉक्टरचे एक प्रिस्क्रिप्शनही तिने दिले होते. त्यांनी सुशांतला ओपीडी पेशंट म्हणून मार्क केले होते आणि न भेटताच ऑनलाईन कंसल्टेशन केले. याचा अर्थ त्याला रुग्णालयात दाखल करणे गरजचे हाेते. कंसल्टेशनशिवाय ही औषधे दिली जाऊ शकत नव्हती. रियाने असेही म्हटले आहे की, या ड्रग्जमुळे त्याचा मृत्यू झाला असता. त्याची बहीण मीतू, ८ ते १२ जूनदरम्यान त्याच्यासोबत होती. मी मुंबई पोलिसांनाही ही गोष्ट सांगितली आहे. 

मला भेटण्यापूर्वीच त्याला अमली पदार्थांचे व्यसन होते. ताे मरिजुआना (गांजा) सेवन करायचा. त्याचे हे व्यसन त्याच्या कुटुंबाला माहीत होते. मी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा माझ्याकडे पुरावा आहे. परंतु, सुशांत तयार नव्हता. त्याची बहीण आणि मेहुणा सिद्धार्थ हेही सुशांतबरोबर ‘मरिजुआना’ सेवन करायचे.

टॅग्स :Rhea Chakrabortyरिया चक्रवर्तीSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत