शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput: सुशांतच्या मृत्यूचा तपास बॉलिवूडच्या दिशेने;‘यशराज फिल्म’कडे मागितली कागदपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:15 IST

गुरुवारी पोलिसांनी या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिचा जबाब नोंदवला तसेच सुशांतच्या घरातून ५ डायऱ्या ताब्यात घेतल्या असून त्याचा तपास करण्यात येणार आहे.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकजण बॉलिवूडच्या घराणेशाहीवर टीका करत आहे, काहींनी या प्रकरणाची थेट कोर्टात तक्रार नोंदवली आहे, करण जोहर, सलमान खान, आलिया भट्टसारख्या कलाकारांना नेटीझन्सकडून ट्रोल करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनीही सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची कारणं शोधण्यासाठी तपासाचा वेग वाढवला आहे.

गुरुवारी पोलिसांनी या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिचा जबाब नोंदवला तसेच सुशांतच्या घरातून ५ डायऱ्या ताब्यात घेतल्या असून त्याचा तपास करण्यात येणार आहे. त्याचसोबत पोलिसांनी यशराज फिल्मला पत्र लिहून सुशांत राजपूतसोबत केलेल्या सिनेमा कराराच्या कॉपी मागवल्या आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, यशराज फिल्मसोबत सुशांतने किती सिनेमा साईन केले होते, त्याचा तपास करण्यात येणार आहे. सुशांतने यशराजच्या २ सिनेमात काम केले होते.

गुरुवारी पोलिसांनी सुशांत राजपूतची पीआर मॅनेजर राधिका निहलानी आणि माजी व्यावसायिक मॅनेजर श्रुती मोदी यांचाही जबाब नोंदवला. श्रुती मोदी ही सुशांत राजपूतसोबत जुलै २०१९ पासून काम करत होती. फेब्रुवारी महिन्यात चिंछोरे या सुशांतच्या शेवटच्या सिनेमात रिलीज होईपर्यंत काम केले.

श्रुती मोदी हिने पोलिसांना सांगितले की, सुशांत नेशन इंडिया फॉर वर्ल्ड या नावाची कंपनी सामाजिक कामासाठी नोंद करणार होता. याद्वारे तो आपत्ती मदत, वृक्षारोपन मोहीम काम करणार होता. पोलिसांनी मंगळवारी सुशांतचे वडील व दोन बहिणी, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा, नोकर अशा १२ जणांचा जबाब नोंदवला आहे.

सुशांत सकाळी साडे सहा  वाजता  उठला. ९ वाजता  त्याने ज्यूस पिऊन साडे नऊच्या सुमारास बहिणीला दूरध्वनी केला होता. साडे दहाच्या सुमारास  सुशांत पुन्हा त्याच्या खोलीत गेला. तो बाहेर आलाच नाही. ११ च्या सुमारास त्याच्या नोकराने त्याला पुन्हा जेवणासाठी विचारले. मात्र त्याच्या खोलीतून कोणतंही प्रतिउत्तर आलं नाही. १२ वाजले तरी सुशांत रुम बाहेर न आल्याने पून्हा नोकर त्याला उठवायला गेला. मात्र तरी सुशांत खोलीतून कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे नोकराने सुशांतसोबत राहणारा त्याचा मित्र सिद्धार्थ याला सांगितले. सिद्धार्थ हा आर्टीस्ट आहे. त्याने सुशांतला फोनकेले मात्र सुशांत फोन ही घेत नव्हता. मग सिद्धार्थने त्याच्या गोरेगाव येथे राहणाऱ्या बहिणीला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याने चावीवाल्याला बोलावले. चावीवाल्याने बनावट चावीने दरवाजा उघडल्यानंतर सुशांतने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात सुशांतची बहिण, २ मॅनेजर, स्वयंपाकी, चावीवाला आणि त्याचा जवळचा मित्र महेश शेट्टी याच्याशी बोलून पोलिसांनी सर्व घटनाक्रम समजावून घेतला आहे.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतMumbai policeमुंबई पोलीस