शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

Sushant Singh Rajput Case : ईडीकडून गौरव आर्याची आठ तासाहून अधिक वेळ झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 22:16 IST

Sushant Singh Rajput Case : ड्रग कनेक्शनच्या माध्यमातून जोडला गेलेला गोव्यातील हॉटेल व्यवसायिक गौरव आर्या याची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने कसून झाडाझडती घेतली.

ठळक मुद्देगेल्या आठवड्यात ईडीने त्याला  नोटीस बजावून 31 ऑगस्टला चौकशीसाठी कार्यालयात हजर रहाण्यास कळविले होते.

मुंबई - सुशांत राजपूतचा मृत्यू प्रकरणात ड्रग कनेक्शनच्या माध्यमातून जोडला गेलेला गोव्यातील हॉटेल व्यवसायिक गौरव आर्या याची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने कसून झाडाझडती घेतली. सुमारे आठ तासाहून अधिक काळ त्याच्याकडे चौकशी सुरु होती. 

सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्तीशी असलेले संबंध, आर्थिक व्यवहार आणि  तिला ड्रग पुरविण्याबाबतचा तपशिला बाबत त्याच्याकडून माहिती घेण्यात येत आहे. त्याच्याकडे आवश्यकतेनुसार आणखी काही दिवस चॊकशी केली जाणार आहे, असे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. 

गेल्या आठवड्यात ईडीने त्याला  नोटीस बजावून 31 ऑगस्टला चौकशीसाठी कार्यालयात हजर रहाण्यास कळविले होते. त्यानुसार सोमवारी अकराच्या सुमारास तो बेलार्ड पियर्ड येथील कार्यालयात हजर झाला. अधिकाऱ्यांकडून  त्याला सुशांत, रिया यांच्याशी संबंध , त्यांना ड्रग पुरविणे,  आर्थिक व्यवहाराबाबत विचारणा करण्यात आली. त्याने सुशांतला आपण कधीही भेटलो नव्हतो, त्याच्याशी परिचय नव्हता असे सांगितले असल्याचे समजते. मात्र रियाला 2017 पासून ओळखत होतो, एका जाहिरातीच्या शूटिंगच्या निमित्याने तिच्याशी परिचय झाला होता, तिच्याशी संपर्कात असल्याचे  सांगितले आहे. मात्र तिला ड्रग पुरविण्याबाबत ,तिच्याशी  व्हाट्सअप  मोबाईलवरील चॅट  आणि त्याचे मुंबईतील इतर सहकारीबाबत कसून विचारणा त्याच्याकडे करण्यात येत असल्याचे  अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीनंतर गौरव आर्याकडे सीबीआय आणि उत्तेजक द्रव्य बाळगणे आणि तस्करीबाबत गुन्हा दाखल केलेल्या एनसीबीकडून चौकशी केली जाणार आहे. 

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, ३५ हजार पोलिसांचा फ़ौजफाटा तैनात

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट

 

संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती 

 

जंगलात आढळला शिर नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता

 

Coronavirus : सहा दिवसांत दुसरा पोलीस ठरला कोरोनाचा बळी; गमावले तीन योद्धे

 

Mahad Building Collapse : महाड इमारत दुर्घटनेतील 4 आरोपी अद्याप फरार, विकसकाची माणगाव न्यायालयात धाव

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याDrugsअमली पदार्थgoaगोवाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय